Team My Pune City – कर्वेनगर आणि शिवणे ( Nilesh Ghaywal)परिसरातील नामांकित शाळांमध्ये अन्न व वाहतूक सेवा पुरवणाऱ्या एका खासगी कंपनीच्या महिला संचालकाला धमकावून तब्बल ४४ लाखांची खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात नीलेश घायवळ, त्याचा भाऊ सचिन आणि अन्य ११ साथीदारांविरोधात वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार महिला कोथरूड परिसरात राहतात ( Nilesh Ghaywal) आणि प्रभात रस्ता भागात त्यांच्या कंपनीचे कार्यालय आहे. त्या कंपनीमार्फत शाळांमध्ये नियमितपणे खाद्यपदार्थ आणि वाहतूक सेवा पुरवली जाते. शाळांना भेटी दरम्यान त्यांची कर्मचाऱ्यांशी ओळख झाली होती. याच दरम्यान, कर्वेनगरमधील एका शाळेतील क्रीडा शिक्षक बापू कदम याच्याशी त्यांची ओळख झाली.

Talegaon Dabhade: संध्यासूरांत न्हाली ‘इंद्रायणी’ ची दिवाळी
२०२४ मध्ये कदमने महिलेला भेट घेऊन “माझी डेअरी कोथरूडमध्ये आहे, शाळेतील उपाहारगृहासाठी दूध आणि पनीर माझ्याकडून खरेदी ( Nilesh Ghaywal) करा,” अशी मागणी केली. महिलेला नंतर कदमचा गुन्हेगारी टोळीशी संबंध असल्याची माहिती मिळाली. तरीही त्यांनी वेळोवेळी त्याच्या खात्यात २२ लाख दोन हजार रुपये पाठवले. मात्र, दूध आणि पनीर पुरवठा न करता त्याने आणि त्याच्या साथीदारांनी महिलेला धमकावून एकूण ४४ लाखांची खंडणी उकळली.
या प्रकरणात नीलेश घायवळ, सचिन घायवळ, ( Nilesh Ghaywal) बापू कदम, पप्पू दळवी, अभि गोरडे, दीपक आमले, बाबू वीर, अमोल बंडगर, बाबू पिसाळ, अमोल लाखे, संदीप फाटक, बबलू गोळेकर आणि बबलू सुरवसे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी ही माहिती दिली.नीलेश घायवळ कोथरूड गोळीबार प्रकरणातही पसार असून त्याच्याविरोधात आतापर्यंत सात गुन्हे दाखल आहेत.