Team My Pune City –दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ( Robbery) शहरात लूटमारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. बाजीराव रस्ता परिसरात एका ६० वर्षीय व्यावसायिकाला धमकावून त्याच्याकडील १ लाख ३० हजार रुपयांची रोकड लुटण्यात आली. या प्रकरणी खडक पोलिसांनी दुचाकीस्वार दोघा चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Sunil Shelke : सामाजिक उपक्रमांतून रोटरी सिटीचे काम कौतुकास्पद-आमदार सुनिल शेळके
तक्रारदार व्यावसायिकाचे इमिटेशन ज्वेलरीचे दुकान कुमठेकर रस्त्यावर असून, ते एक ग्रॅम सोन्याचे दागिने विकतात. गुरुवारी दिवसभर विक्री झाल्यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांनी दुकान बंद केले आणि दुचाकीवरून शुक्रवार पेठेतील घरी निघाले. रोकड त्यांनी दुचाकीच्या डिक्कीत ठेवली होती.

टेलीफोन भवनजवळील गल्लीतून जात असताना दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांना अडवले. त्यांनी व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी देत धक्काबुक्की केली. घाबरलेल्या व्यावसायिकाने डिक्कीत ठेवलेली रोकड चोरट्यांच्या हवाली ( Robbery) केली. त्यानंतर चोरटे भरधाव वेगात पसार झाले.
Bharat Natya Mandir : मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी भरत नाट्य संशोधन मंदिरातर्फे 51 हजार रुपये
घटनेनंतर व्यावसायिकाने खडक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. चोरट्यांचा शोध सुरू आहे.
दरम्यान, अशाच प्रकारची दुसरी घटना बिबवेवाडी-गंगाधाम रस्त्यावरही घडली. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास दुचाकीवरून जात असलेल्या एका व्यापाऱ्याला अडवून चोरट्यांनी त्याच्याकडील ४५ हजारांची रोकड लुटली. या सलग दोन घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले ( Robbery) आहे.