Team My Pune City – मुळशी रोडवरील भुकूम बस स्टॉप ( Accident)परिसरात आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास दोन वाहनांचा अपघात झाला. या अपघातात MH-12 XX 2058 या क्रमांकाची टोयोटा हायरायडर कार अचानक पेट घेऊन तिच्या बॉनेटला आग लागल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातानंतर गाडीच्या पुढील भागातून धूर व ज्वाला उसळू लागल्या. यावेळी उपस्थित नागरिकांनी तत्परतेने मदतकार्य सुरू केले. परांजपे फॉरेस्ट ट्रेल येथील फायर गाडीच्या सहाय्याने आग नियंत्रणात आणण्यात आली. एनडीए फायर ब्रिगेडची गाडी घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच स्थानिकांनी आग आटोक्यात आणली होती. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून एनडीए दलाने घटनास्थळी पाहणी करून गाडीच्या बॉनेटमधील धूर पूर्णपणे थांबवण्यासाठी होजरील होजच्या सहाय्याने पाणी मारून आग पूर्णपणे विझवली.
या अपघातात टोयोटा गाडीचा चालक किरकोळ जखमी झाला असून, त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सुदैवाने मोठा अनर्थ ( Accident) टळला.
सदर आग विझविण्याची व अपघातस्थळावरील कार्यवाही प्रभारी अधिकारी सुनील नामे यांच्या मार्गदर्शनाखाली ड्रायव्हर दत्ता गोगावले, फायरमन पंढरीनाथ उभे, संकेत करांडे, शिवकुमार माने तसेच मदतनीस मनोज गायकवाड व राकेश नाईकनवरे यांनी दक्षतेने पार पाडली. काम पूर्ण झाल्यानंतर पथकाने सुरक्षितपणे फायर स्टेशनकडे प्रस्थान ( Accident) केले.