Team My Pune City – कोंढवा बुद्रुक आणि महंमदवाडी परिसरात झालेल्या( Pune Crime News) तीन वेगवेगळ्या घरफोड्यांमध्ये तब्बल बारा लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे.
कोंढवा बुद्रुकमधील टिळेकर नगर भागात मंगळवारी (१४ ऑक्टोबर) पहाटे ( Pune Crime News) अज्ञात चोरट्याने घरफोडी करून पाच लाख ८६ हजार रुपयांचा ऐवज चोरला. याप्रकरणी संतोष नागेंद्र पतंगे (वय ४२, रा. टिळेकर नगर) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. चोरट्याने घराच्या पार्किंगमधील खोलीचा कडीकोयंडा तोडून प्रवेश केला आणि लोखंडी कपाटातील सेफ्टी लॉकर फोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा ऐवज चोरून नेला.
Maval: मावळचे भजनसम्राट ह.भ.प. नंदकुमार शेटे महाराज यांना “महाराष्ट्र भूषण” पुरस्काराने सन्मान
महंमदवाडीतील हेवन पार्क सोसायटीमध्येही अशाच प्रकारची घटना घडली. अज्ञात चोरट्याने लोखंडी कपाटाचे दरवाजे व लॉकर उघडून सुमारे दोन लाख ३१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरले. या प्रकरणी मोनिका कौस्तुभ जाधव (वय ३७) यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली( Pune Crime News) आहे.
Anupam Joshi : अनुपम जोशी यांच्या सरोद वादनाची रंगली मैफल..!
दरम्यान, कोंढवा खुर्द येथील साईबाबानगर परिसरात मंगळवारी दुपारी आणखी एक घरफोडी झाली. या घटनेत चोरट्याने घराच्या दरवाजाचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला आणि शयनगृहातील लोखंडी कपाटाचे लॉकर फोडून सुमारे चार लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व रोकड चोरले. या प्रकरणी पुष्पा जनार्धन खैरे (वय ६०) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली ( Pune Crime News) आहे.