Team My Pune City – शहरातील लोहगाव परिसरात घडलेल्या ( Lohegaon Molestation News) धक्कादायक प्रकारात एका ७२ वर्षीय वृद्धाने अल्पवयीन मुलांना अश्लील व्हिडिओ दाखवून गैरवर्तन केल्याचे उघडकीस आले आहे. या संतापजनक प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, विमाननगर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध POCSO कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा लोहगाव परिसरात राहणारा असून, तो आपल्या घरात येणाऱ्या परिसरातील मुलांशी चुकीचे वर्तन करत होता. त्याने मुलांच्या निष्पाप विश्वासाचा गैरफायदा घेत त्यांना मोबाईलवर अश्लील दृश्ये दाखविली .तसेच अनुचित वर्तन केले. हा प्रकार ६ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत घडल्याचे पोलिस तपासात समोर ( Lohegaon Molestation News) आले आहे.
Rain Update : “पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट; विजांसह पावसाची शक्यता”
या प्रकरणाचा उलगडा तेव्हा झाला, जेव्हा आरोपीची सात वर्षांच्या नातीनेच आपल्या पालकांना आजोबांच्या वर्तनाबद्दल माहिती देत तक्रार केली. मुलीच्या सांगण्यावरून पालकांनी तत्काळ पोलिसांकडे धाव घेतली आणि प्रकाराची नोंद ( Lohegaon Molestation News) केली.
विमाननगर पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, आरोपीने मुलांवर ठेवलेल्या विश्वासाचा गैरवापर करत त्यांच्याशी अशोभनीय वर्तन केले. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ७५(१)(i) तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) कलम ८ आणि १२ अंतर्गत गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू ( Lohegaon Molestation News) आहे.
Rashi Bhavishya 16 Oct 2025 – कसा जाईल आपला आजचा दिवस?
दरम्यान, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून सविस्तर चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे लोहगाव परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, अशा विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत ( Lohegaon Molestation News) आहे.