Team My Pune City – राज्यातील विरोधी पक्षनेत्यांच्या शिष्टमंडळानं राज्य निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींची भेट घेतली होती. त्यावेळी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मतदार याद्यांमधील घोळ दूर (Eknath Shinde)येईपर्यंत निवडणुका पुढे ढकला अशी मागणी केली आहे.त्यानंतर आता सत्ताधारी पक्षाकडून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्रांच्या प्रतिक्रियेनंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. विरोधकांची ही महा कन्फ्यूजन आघाडी असून पराभव दिसू लागल्यामुळेच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच, अशा पद्धतीची मागणी करत आहेत. असते म्हणाले.
पत्रकारांना बोलतांना एकनाथ शिंदे म्हणाले , महायुती जिंकणार याची खात्री विरोधकांना झाली आहे. विधानसभेत झालेल्या पराभव पराभवामुळे विरोधकांची मानसिकता खचली आणि निवडणुकांना सामोरे जाण्याची त्यांची मानसिकता दिसत नाही. त्यामुळेच, निवडणुका पुढे ढकला, अशा पद्धतीची मागणी महाविकास आघाडीकडून केलं जात आहे. सगळे एकत्र आल्यामुळे जिंकण्याची खात्री विरोधकांना पटली पाहिजे होती. मात्र, जिंकण्याची खात्री नसल्यामुळे महायुती जिंकणार असा विश्वास त्यांना निर्माण झाला आहे, त्यामुळेच अशी मागणी केली.
Ajit Pawar: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती असावी अशी आमची अपेक्षा -अजित पवार
Somatane Phata : पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकास अटक
महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये महायुतीपेक्षा जास्त जागा मिळाल्या तेव्हा निवडणूक आयोग चांगला होता, त्यावेळी कोणताही आक्षेप त्यांनी घेतला नाही. आता हरल्यानंतर निवडणूक आयोगाला दोष देण्याचे काम ते करत आहेत. ईव्हीएम मशिनची प्रक्रिया ही काँग्रेसच्या काळामध्ये सुरू झालेली आहे, ही आमच्या महायुतीच्या काळात सुरू झालेली नाही, असेही शिंदें म्हणाले.