Team My Pune City – काळ्या पैशांच्या ( Cyber Fraud) व्यवहारात तुमचे बँक खाते वापरले गेले असून, या प्रकरणात अटक होऊ शकते, अशी भीती दाखवून सायबर चोरट्यांनी डेक्कन जिमखाना परिसरातील ८८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १९ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Elections : महाराष्ट्रात मतदार यादी विशेष सुधारणा मोहीम पुढे ढकलण्याची राज्य निवडणूक आयोगाची विनंती
या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रसाद राऊत तपास करत आहेत.( Cyber Fraud)
Pulse Polio: पल्स पोलिओ मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद
फसवणुकीची पद्धत
९ जुलै रोजी चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या मोबाईलवर संपर्क साधला. “गोयल नावाच्या व्यक्तीने ५३८ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला असून त्यासाठी तुमचे आधारकार्ड आणि पॅनकार्ड वापरले आहे. त्यामुळे तुमच्या बँक खात्याची तपासणी करावी लागेल, अन्यथा पोलिसांकडून अटक होईल,” असे सांगून त्यांनी भीती निर्माण केली.
या धमकीला बळी पडून ज्येष्ठ नागरिकांनी वेळोवेळी चोरट्यांच्या खात्यात १९ लाख ८० हजार रुपये जमा केले. मात्र, त्यानंतरही चोरट्यांनी आणखी पैशांची मागणी केली. संशय आल्याने ज्येष्ठांनी चौकशी केली असता फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि त्यांनी पोलिसांकडे तक्रार ( Cyber Fraud) नोंदवली.