Team My Pune City –महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आज पुण्यात आहेत. एबीव्हीपी संघटना (Amit Thackeray )आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्या वाद झाला होता. त्यानंतर मनविसेच्या कार्यकर्त्यांनी अभाविपच्या कार्यालयाला टाळं लावलं. मनविसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे पुणे दौऱ्यावर आले होते.
पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची शाखा सुरू करण्यात आली आहे. पण या कार्यक्रमाच्या ठिकाणी एबीव्हीपीने पोस्टर लावल्याने दोन्ही संघटनांमध्ये वाद उफाळला होता. यानंतर आज अमित ठाकरेंनी पुण्यात आयुक्तांची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराबाबत चर्चा केली.यानंतर अमित ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना अभाविपवर जोरदार टीका केली.
अमित ठाकरे म्हणाले,”काल जो राडा झाला त्यानंतर मी आज आयुक्तांना भेटायला आला होतो. हे दुसऱ्यांदा झालं आहे. ते जरी सत्तेत असले तरी कितीही प्रेशर टाकलं तरी काही फरक पडणार नाही. मी माझ्या मुलांसोबत आहे. तुम्ही बोट घातलं, तर आम्ही हात घालणार. ॲक्शनला रिअॅक्शन मिळणारच,” असं अमित ठाकरे म्हणाले आहेत.
Maval: मावळ पंचायत समितीचे आरक्षण जाहीर
Gold-Price: सोनं-चांदी पुन्हा महागले
ते पुढे म्हणाले ,कायदा सुव्यवस्था आम्हाला बिघडवायची नाही. एवढंच मी सांगतोय की कायदा हा सगळ्यांना समान असला पाहिजे. दुसऱ्यांच्या मधे येण्यापेक्षा स्वतःचं अस्तित्व निर्माण करा. काल एका ऑफिसला टाळे ठोकलं आहे. जे पोस्टर लावलेलं आहे त्यासंदर्भात मी पोलीस आयुक्तांशी बोललो आहे. सीसीटीव्हीमध्ये जर त्यांची मुलं असतील तर त्यांचे सर्व ऑफिसेस बंद करावे लागतील. यापुढे जर आम्ही पोस्टर लावले आणि बॉयकॉट लिहिल तर चालेल का?,” अशी विचारणा त्यांनी केली आहे. “ती मुलं कोण आहेत ते बघू. यापुढे आमची अशीच रिएक्शन मिळणार,”.
“पुण्याची भीषण परिस्थिती झाली आहे. ड्रग्ज, महिलांवर अत्याचार, लहान मुलांना दारु, पोर्शे अपघातात दोन मुलांनं उडवलं त्याचं पुढे काय झालं? पुण्यात भीषण परिस्थिती आहे यावर फक्त पोलीस आयुक्त काम करू शकतात हे आज मी सांगून आलेलो आहे. अठरा वर्षाखालील मुलांना ड्रग्स, दारू देत असाल तर हे भीषण आहे. याची आम्ही लिस्ट तयार करणार आहोत. ट्रेस पासिंगचा गुन्हा दाखल केला आहे. छोटा गुन्हा आहे. गुन्हे अंगावर घ्यायची आम्हाला सवय आहे,” असंही त्यांनी सांगितलं.
प्रकरण नेमकं काय
पुण्यातील नोरोसजी वाडिया महाविद्यालय इथं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून ‘बॉयकॉट मनविसे’सह दोन संघटना बॅन असं पत्रक लावलं होतं. याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आक्रमक झाली होती. त्यांनी सदाशिव पेठेतील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मुख्य कार्यालयाला टाळे ठोकळ होत. या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी मंगळवारी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुंभार यांची भेट घेत या प्रकरणाबाबत चर्चा केली आहे.