Team My Pune City – एका नागरिकाच्या आधारकार्डाचा( Nilesh Ghaywal) गैरवापर करून त्याच्या नावावर सिमकार्ड घेतल्याचा प्रकार उघडकीस आला असून, नीलेश घायवळ याच्याविरोधात कोथरूड पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सिमकार्डचा वापर करून त्याने वेगवेगळ्या बँकांमध्ये खाती उघडली आणि मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार करत संबंधित नागरिकासह बँकांची फसवणूक केली आहे.
Rain Update : पश्चिम महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, १३ जानेवारी २०२० रोजी रात्री नीलेश घायवळ याने त्याला जबरदस्तीने एका ठिकाणी नेले आणि जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याचे आधारकार्ड वापरून ‘बॉस’ या नावाने सिमकार्ड घेतले. हे सिमकार्ड स्वतःचे असल्याचे भासवून त्याने अनेक बँकांमध्ये खाती उघडली आणि आर्थिक व्यवहार( Nilesh Ghaywal) केले.
महत्त्वाचे म्हणजे, नीलेश घायवळ याने फसवणूक, धमकी आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकिंग प्रणालीचा गैरवापर केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोथरूड पोलिसांनी त्याच्याविरोधात फसवणूक आणि धमकी दिल्याबाबत गुन्हा दाखल केला ( Nilesh Ghaywal) आहे.