Team My Pune City – अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पुण्यातील सदाशिव (Pune )पेठेतील कार्यालयाची तोडफोड करुन कार्यकर्त्याला मारहाण केल्या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह २० ते ३० जणांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी अभाविपच्या कार्यकर्त्या संजीवनी कसबे (वय २०) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार,महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी यांच्यासह २० ते ३० जणांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सोमवारी (१३ ऑक्टोबर) दुपारी साडेतीनच्या सुमारास सदाशिव पेठेतील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयात शिरले. अभाविपच्या कार्यालयातील कार्यकर्ते सार्थक वेळापुरे यांनी शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. कार्यालयाची तोडफोड करुन त्यांनी अभाविपच्या कार्यालयातील भिंतीवर पत्रक चिकटवले. कार्यालयाला कुलूप लावून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तेथून निघून गेले, असे संजीवनी कसबे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
Thackeray Brothers: ठाकरे बंधू एकत्र! मविआ-मनसे नेत्यांचं शिष्टमंडळ निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला
Maval: पत्नीची पतीला मारहाण
परिमंडळ एकचे पोलीस उपयुक्त ऋषिकेश रावले ,विश्रामबाग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार ,सहाय्यक निरीक्षक राजेश उसगावकर यांनी घटना स्थळास भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक सुरवसे पुढील तपस करत आहेत.