situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

PMC : सीसीटीव्ही केबलसाठी मनमानी खोदाई; महापालिकेचा ठेकेदाराला इशारा

Published On:
PMC

Team My Pune City –पुणे महापालिकेने शहरातील( PMC) काही ठराविक भागांमध्ये सीसीटीव्ही केबल टाकण्यासाठी रस्ते खोदाईची मर्यादित परवानगी दिली होती. मात्र, पोलिस विभागाने नेमलेल्या ठेकेदाराने या परवानगीचा गैरवापर करत मनमानी पद्धतीने विविध भागांत रस्ते खोदल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत महापालिकेने संबंधित ठेकेदाराला कडक शब्दांत समजपत्र पाठवत पुढील काळात नियमभंग झाल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

Thackeray Brothers: ठाकरे बंधू एकत्र! मविआ-मनसे नेत्यांचं शिष्टमंडळ निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला

महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी यासंदर्भात माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी मध्यवर्ती पेठांमध्ये मर्यादित खोदाईस परवानगी देण्यात आली होती. मात्र, ठेकेदाराने संधी साधून इतर भागांतही रस्ते खोदाई सुरू केली. दररोज ठराविक मीटर खोदाई अपेक्षित असताना प्रत्यक्षात किलोमीटर अंतरावर काम केल्याचे ( PMC) निदर्शनास आले.

Rashi Bhavishya 14 Oct 2025 – कसा जाईल आपला आजचा दिवस?

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत ठेकेदाराच्या मनमानी कामाची पुरावे सादर केली. यामध्ये ठेकेदाराने परवानगी नसलेल्या भागांत रस्ते खोदल्याचे २८ फोटो दाखवण्यात आले. त्यानंतर आयुक्तांनी ठेकेदाराला सुनावले आणि यापुढे महापालिकेकडे तक्रार येऊ न देण्याची समज ( PMC) दिली.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिक मोठ्या संख्येने मध्यवर्ती पेठांमध्ये खरेदीसाठी येतात. अशा वेळी रस्ते खोदाईमुळे पादचाऱ्यांना आणि वाहनचालकांना अडथळा निर्माण होतो. त्यामुळे महापालिकेने ठेकेदाराला पत्र पाठवून देवाळीपर्यंत रस्ते खोदाईची कामे तात्काळ थांबवण्याचे निर्देश दिले ( PMC) आहेत.

Follow Us On