situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune: दिवाळी अंक सर्जनशील लेखक तयार करणारी प्रयोगशाळा- प्रा. मिलिंद जोशी

Published On:

दिवाळी अंकांमध्ये आजही वैचारिक मोकळेपणा टिकून – प्रा. मिलिंद जोशी

उत्कर्ष प्रकाशनच्या पहिल्या उत्कर्ष दिवाळी अंकाचे प्रकाशन

Team My Pune City -मराठी साहित्याच्या क्षेत्रात दिवाळी अंकांचे योगदान मोठे (Pune)आहे. सर्जनशील लेखक तयार करणारी प्रयोगशाळा म्हणून दिवाळी अंकांचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले. समाजजीवनातून वैचारिकता हरवत चाललेल्या काळात दिवाळी अंकांमध्ये आजही वैचारिक मोकळेपण दिसून येते असेही त्यांनी गौरवाने नमूद केले.

उत्कर्ष प्रकाशनच्या उत्कर्ष या पहिल्या दिवाळी अंकाचे प्रकाशन आज (दि. 13) प्रा. जोशी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ संपादक विजय कुवळेकर, ज्येष्ठ साहित्यिका मंगला गोडबोले, प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, प्रसिद्ध चित्रकार रवी मुकुल, कवी, लेखक स्वप्नील पोरे, उत्कर्ष प्रकाशनचे सु. वा. जोशी, दिवाळी अंकाच्या संपादिका निलीमा जोशी-वाडेकर मंचावर होते. सावरकर सभागृह, कर्वे रोड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Maval: मावळ पंचायत समितीचे आरक्षण जाहीर

Gold-Price: सोनं-चांदी पुन्हा महागले

दिवाळी अंकांनी लेखनातील अनेक प्रवाह स्वीकारले. कालांतराने त्या-त्या प्रवाहांचे दिवाळी अंक प्रसिद्ध होऊ लागले, असे सांगून प्रा. मिलिंद जोशी पुढे म्हणाले, दिवाळी अंकांनी संपादक, लेखक, चित्रकार यांच्यासाठी जसे पोषक वातावरण निर्माण केले त्याच प्रमाणे त्यांना प्रतिष्ठाही मिळवून दिली. जागतिकीकरणानंतर झालेल्या स्थित्यंतरामुळे दिवाळी अंकांनी इतर ज्ञानशाखांचाही विचार केला. त्याच-त्याच लेखकांमुळे काही दिवाळी अंकांमध्ये साचलेपण दिसून येते आहे, याचा विचार व्हायला हवा. भविष्याचा विचार करता लेखक अंतर्मुख होणे तर दिवाळी अंकांच्या संपादकांनी बहिर्मुख होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

विजय कुवळेकर यांनी सु. वा. जोशी यांच्या कार्याचा सुरुवातीस गौरव केला. अंतरिक प्रेरणेने त्यांच्यातील उर्जा पुढील पिढीकडे संक्रमित झाली आहे. मराठी वाचकांसाठी उत्कर्ष दिवाळी अंकामुळे नवे दालन खुले झाले आहे. ते पुढे म्हणाले, दिवाळी अंकांचे संपादक जमिनीवर राहिले तर त्याला अंकासाठी खूप विषय मिळतात. याचे प्रतिबिंब उत्कर्षच्या दिवाळी अंकात दिसून येते. जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारा असा हा अंक असल्याचे ते म्हणाले.

मंगला गोडबोले म्हणाल्या, दिवाळी हा सामूहिक आनंदाचा सण असून दिवाळी अंक हा सामूहिक प्रतिभेचा, उद्गाराचा, आनंदाचा भाग आहे. साहित्य, संस्कृतीची ओल दिवाळी अंकांमुळेच टिकून राहिली आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

सुधीर गाडगीळ, रवी मुकुल, स्वप्नील पोरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक आणि मान्यवरांचे स्वागत सु. वा. जोशी, निलीमा जोशी-वाडेकर यांनी तर सूत्रसंचालन शाम भुर्के यांनी केले.

Follow Us On