Team My Pune City -एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांना (ST Bus)प्रत्येकी ६ हजार रुपयांची दिवाळी भेट देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. त्याचसोबत कर्मचाऱ्यांना 12 हजारांची उचलही घेता येणार आहे. एसटी महामंडळाला एसटी कर्मचाऱ्यांसाठी दर महिन्याला 65 कोटी रुपये देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे. त्यामुळे दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन करण्याचा निर्णय मागे घेतल्याची माहिती आहे.
ऐन दिवाळीत एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांनी अनेक प्रलंबित मागण्यासाठी चक्का जाम आंदोलनाचा निर्णय जाहीर केला होता. या आंदोलनामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली असती. त्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एसटी कर्मचारी संघटनांसोबत आज महत्त्वाची बैठक घेतली .त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांना ६००० रुपये दिवाळी भेट आणि १२,५०० रुपये उचल देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी गोड जाणार आहे. या निर्णयात सरासरी ७५०० वेतनवाढ फरक हप्ता प्रति महिन्याला देण्याचे देखील मान्य करण्यात आले आहे. एसटी महामंडळाला त्यासाठी सरकार दर महिन्याला ६५ कोटी रुपये देणार आहे.
या बैठकीनंतर १३ ऑक्टोबरच्या रात्रीपासून करण्यात येणारं आंदोलन एसटी कर्मचारी संघटनांनी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Maval: मावळ पंचायत समितीचे आरक्षण जाहीर
Gold-Price: सोनं-चांदी पुन्हा महागले
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या
२०१८ पासून एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरक देण्यात आलेला नाही. सन २०२० ते २०२४ या कालावधीतील वेतनवाढ फरकाची रक्कम थकीत आहे. याशिवाय इतर अनेक रक्कमा थकीत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांची एकूण ४००० कोटी रुपयांपेक्षा जास्त थकीत रक्कम मिळालेली नाहीत. थकीत रक्कम कर्मचाऱ्यांना मिळण्यासाठी एक वेळचा पर्याय म्हणून सरकारने ही रक्कम एसटीला दिली पाहिजे अशी मागणीही कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.