Team My Pune City – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२६ (10th-12th exams)मध्ये होणाऱ्या दहावी (एस.एस.सी.) आणि बारावी (एच.एस.सी.) परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.
राज्यातील सर्व विभागांमध्ये — पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, लातूर, अमरावती, संभाजीनगर आणि कोकण — या तारखा लागू राहतील.
परीक्षा वेळापत्रक:
बारावीची लेखी परीक्षा – मंगळवार, १७ फेब्रुवारी २०२६ पासून ते २४ मार्च २०२६ पर्यंत.
दहावीची लेखी परीक्षा – गुरुवार, २६ फेब्रुवारी २०२६ पासून ते १८ मार्च २०२६ पर्यंत.
बारावीचे मौखिक आणि प्रात्यक्षिक परीक्षा – २ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान.
दहावीचे मौखिक आणि प्रात्यक्षिक परीक्षा – २ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान.
प्रात्यक्षिक विषय:
बारावीमध्ये माहिती तंत्रज्ञान आणि सामान्यज्ञान, तर दहावीमध्ये शारीरशास्त्र, आरोग्यशास्त्र आणि गृहशास्त्र या विषयांची प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जाईल.
Maval: मावळ पंचायत समितीचे आरक्षण जाहीर
Gold-Price: सोनं-चांदी पुन्हा महागले
विद्यार्थ्यांना सूचना:
विद्यार्थ्यांनी आता पासूनच अभ्यासाची तयारी सुरू करावी. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम आणि वेळापत्रकानुसार मार्गदर्शन करावे, असे मंडळाने सांगितले आहे.
राज्य मंडळाने सांगितले की लवकरच विषयवार सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर केले जाईल.
ही माहिती मंडळाचे सहाय्य सचिव प्रमोद गाफणे यांनी दिली असून, अधिसूचना 13 ऑक्टोबर 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.