Team My Pune City –संपूर्ण राज्यात दरवर्षी दिवाळीचा सन मोठ्या उत्साहात साजरा होतो. सर्वसामान्य जनतेप्रमाणे(Baramati ) राजकीय नेतेमंडळींची दिवाळी सुद्धा खास असते. याच राजकीय नेत्यांमधील एक असलेले राष्ट्रवादी काँग्रेस चे जेष्ठ नेते शरद पवार यांच्या दिवाळीची सर्वत्र चर्चा असते.
पवार कुटुंब मोठ्या उत्साहात बारामतीत दिवाळी सण साजरा करत असते. पवार कुटुंबातील सर्व व्यक्ती एकत्र येत गोविंद बागेत दिवाळी पडावा करत असतात. या पाडव्याला शरद पवारांना भेटण्यासाठी राज्यभरातून विविध राजकीय पक्षातील आमदार, खासदार यांच्यासह राष्ट्रवादी चे कार्यकर्ते येत असतात.
Gahunje: गहुंजे येथे पोहायला गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू
Talegaon Dabhade:राव कॉलनी मध्ये खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रमाचा आनंद

पण यावर्षी बारामतीमध्ये पवार कुटुंबीयांकडे दिवाळी पाडवा साजरा होणार नाही. कारण, या वर्षी शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या पत्नी भारती पवार यांचं निधन झालं आहे. त्यामुळे पवार कुटुंबीयांनी दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे.