Team My Pune City – एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य मार्ग परिवहन एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी (ST Bus)एक घोषणा केली आहे. दिवाळीत लाखो प्रवासी एसटीने प्रवास करत असतात. यासाठी दिवाळीच्या आधी एसटी महामंडळाने प्रवाशांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आवडेल तिथे प्रवास योजनेच्या पासमध्ये एसटीने 20-25 टक्के कपात करुन प्रवाशांना सुखद धक्का दिला आहे.ही कपात 7 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू केली आहे.
Nilesh Ghaywal Case : नीलेश घायवळविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस; पुणे पोलिसांचा इंटरपोलशी संपर्क
Gahunje: गहुंजे येथे पोहायला गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू
आवडेल तिथे प्रवास योजना काय आहे
प्रवाशांना ‘आवडेल तेथे प्रवास’ या योजनेअंतर्गत एकाच पासवर राज्यातील कुठेही प्रवास करण्याची सुविधा मिळते आहे. या योजने नुसार प्रवाशांना एकाच पासवर राज्यातील कोणत्याही एसटी बसने लालपरी, सेमीलक्झरी, शिवशाही आदीने अमर्याद प्रवास करण्याची मुभा मिळते आहे. एसटीचा चार किंवा सात दिवसांचा पास घेतल्यावर प्रवाशांना दरवेळी तिकीट काढण्याची आवश्यकता नसते.एसटी प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
एसटी पाससाठी पुढील अटी –
एसटीच्या योजनेअंतर्गंत पौढ पासधारकास 30 किलो व 12 वर्षाखालील मुलास 15 किलो प्रवासी सामान मोफत नेता येते.
प्रवाशांचा पास हरवल्यास त्याऐवजी दुसरा पास मात्र घेता येत नाही. प्रवाशांना तो पास जपून ठेवणे आवश्यक आहे.
स्वतःचा पास दुसऱ्या प्रवाशाला देऊन त्याचा गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास तो जप्तदेखील केला जातो.
चार दिवसांच्या पासचे दर
बस प्रकार- जुने दर (स्त्री \पुरुष/मुले) सुधारित दर
साधी, जलद, रात्रसेवा – आधी 1814 /910 – आता 1364/685
शिवशाही (आंतरराज्य) -आधी2533/1269 – आता 1818/911
सात दिवसाच्या पासचे दर
बस प्रकार जुने दर सुधारित दर
साधी, जलद रात्रसेवा – आधी 3171/1588 – आता 2682/1194
शिवशाही (आंतरराज्य) – आधी 4429/2217 -आता 3175/1590