हिंदू आध्यात्मिक सेवा संस्था पूरग्रस्त भागातील महिलांसाठी साड्या पाठवणार
Team My Pune City – “मंदिरे ही केवळ उपासनेची स्थळे नसून समाज परिवर्तनाची ( Hindu Spiritual Service Society) संस्कार केंद्रे आहेत,” असे मत ज्येष्ठ समाजसेवक गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केले. हिंदू आध्यात्मिक सेवा संस्था, महाराष्ट्रची मासिक बैठक नुकतीच पुण्यात संपन्न झाली. या बैठकीस अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या अध्यक्षतेखाली पद्मश्री गिरीश प्रभुणे मार्गदर्शनासाठी उपस्थित होते.
प्रभुणे म्हणाले, “सनातन कार्याची गती आणि काळाच्या गरजा यांचा मेळ साधणे अत्यंत आवश्यक आहे. संघकार्य आणि अध्यात्म यांचा संगमच समाज परिवर्तनाचा पाया आहे.” त्यांनी संस्थेच्या कार्यकर्त्यांना संघटितपणे, श्रद्धा आणि सेवाभावाने कार्य करण्याचे मौल्यवान मार्गदर्शन केले.
बैठकीच्या प्रारंभी उपाध्यक्ष संजय भोसले यांनी प्रास्ताविक केले, तर उपाध्यक्ष राधेश्याम अग्रवाल ( Hindu Spiritual Service Society) यांनी येणाऱ्या अन्नकूट कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली. यावेळी सीए यशस्वी अग्रवाल यांच्या यशाचा आणि पुणे मर्चंट असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांच्या सन्मानाचा कार्यक्रमही झाला. तसेच बैठकीदरम्यान गिरीश शहा यांनी सेवाभारतीमार्फत पूरग्रस्तांना साड्यांचे दान केले, या साड्या पूरग्रस्त महिलांना पाठवण्यात येणार आहेत.
यानंतर विविध विभागांचे महिनाभरातील कार्यनिवेदन सादर करण्यात आले. नवरात्रीदरम्यान सरस्वती विद्यालय व एनी एम एस शाळेत झालेल्या कन्यावंदन कार्यक्रमाचे निवेदन सोनिया श्रॉफ यांनी दिले. एस.पी.एम. शाळेत झालेल्या कार्यक्रमाचे कौतुक माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी पत्राद्वारे केले होते. या उपक्रमाचे नियोजन एच.एस.एस.एफ. अध्यापक प्रशिक्षक रमा कुलकर्णी यांनी ( Hindu Spiritual Service Society) केले होते.
Prashant Bhagwat : विकास, समाजकार्य आणि जनसंपर्क यांचा अद्भुत संगम म्हणजे प्रशांत दादा भागवत
कार्यनिवेदन सादर करणाऱ्यांमध्ये राजेश मेहता, अशोक रुकारी, अखिल झांजले, वैशाली लवांधे, अथर्व नौसारीकर, उदय कुलकर्णी, विक्रम शेठ, नितीन पहलवान आणि जयंत पवार यांचा समावेश होता. त्यांनी संपर्क, मठ-मंदिर, वारकरी समूह, युवा विभाग, आयटी, कोष व प्रशासकीय विभागाच्या कार्याचा आढावा घेतला.पहिल्यांदाच सहभागी झालेल्या पियुष वाघाळे (किशोर मार्शल आर्ट), सुधांशु एरंडे (सोशल मीडिया) आणि प्रकाश लोंढे (सनातन विद्या फाउंडेशन – एनजीओ) यांनी ( Hindu Spiritual Service Society) आपला व आपल्या कार्याचा परिचय दिला.
सहमंत्री संदीप सारडा यांनी अतिथींचा परिचय करून दिला व संघ शताब्दी निमित्त होणाऱ्या आगामी कार्यक्रमांबाबत माहिती दिली. तर महामंत्री किशोर येनपुरे यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये होणाऱ्या परमवीर चक्र विजेत्यांच्या वंदन कार्यक्रमाचे मार्गदर्शन केले व आभार मानले.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन योगेश भोसले यांनी केले असून सूत्रसंचालन ( Hindu Spiritual Service Society) शैलेंद्र प्रधान यांनी केले.