Team My Pune City –महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ठाकरे बंधूंची वाढती जवळी चर्चेचा विषय आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठींचे सत्र गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने सुरू आहे. आज राज ठाकरे सहकुटुंब मातोश्रीवर स्नेहभोजनासाठी दाखल झाले आहेत. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मनसे-ठाकरे सेना यांच्यात युती होणार अशा चर्चां सुरु आहे.
राज ठाकरे यांची आजची मातोश्री भेट ही अत्यंत खास ठरली (Raj Thackeray)आहे. कारण राज ठाकरे पहिल्यांदाच सहकुटुंब मातोश्रीवर दाखल झालेआहे.
‘मी माझ्या कुटुंबासोबत आलो आहे. माझी आई माझ्यासोबत आहे. ही कौटुंबिक भेट आहे,’ अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी माध्यमांना दिली आहे.
Lonikand Crime News : लोणीकंद येथे युवकाकडून २२ लाखांहून अधिक किमतीचा अफू जप्त
Gahunje: गहुंजे येथे पोहायला गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू
राज -उद्धव यांच्यातील वाढत्या भेटीगाठीमुले दोघे भाऊ येत्या महापालिका निवडणुका एकत्र लढणार अशी चर्चा सुरु आहे.
ठाकरे बंधू मनसे आणि ठाकरे गट महापालिका निवडणुकासाठी एकत्र आल्यास मराठी मतांचे विभाजन टळेल आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. या भेटी केवळ कौटुंबिक आहेत की यातून महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा नवे वळण मिळणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे.