situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Santhosh Dhumal : घायवळ टोळीचा माजी सदस्य संतोष धुमाळवर मोक्का

Published On:
Santhosh Dhumal

Team My Pune City – घायवळ टोळीचा माजी सदस्य आणि सध्या तिचाच कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या संतोष आनंद धुमाळवर ( Santhosh Dhumal) पुणे पोलिसांनी मोक्का (MCOCA) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कोथरूड परिसरात १० लाख रुपयांच्या खंडणीसाठी धमकी दिल्याच्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून, यामुळे गुन्हेगारी विश्वात एकच खळबळ उडाली आहे.

कोथरूड पोलिस ठाण्यातील माहितीनुसार, संतोष धुमाळसह ( Santhosh Dhumal) त्याचे साथीदार विपुल उत्तम माझिरे आणि सागर गवासने यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणात रोहित आखाडे या तरुणाने तक्रार दाखल केली आहे.

MP Shrirang Barne : मावळातील प्रस्तावित नगररचना तत्काळ रद्द करण्याची मागणी, खासदार बारणे यांचे उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

फिर्यादी रोहित आखाडे यांच्या म्हणण्यानुसार, २०२१ साली तो संतोष धुमाळ ( Santhosh Dhumal) गँगसोबत कार्यरत होता. त्यावेळी एका गुन्ह्यात त्याला अटक झाली आणि पोलिसांना त्याने धुमाळबाबत माहिती दिली होती. याच रागातून धुमाळने काही दिवसांपूर्वी मध्यरात्री व्हिडिओ कॉल करून आखाडेला धमकावले. “तुझ्यामुळे मला अटक झाली, त्यामुळे १० लाख रुपये दे, नाहीतर माझी गोळी खायची ताकद ठेव,” अशी धमकी त्याने दिली. सुरुवातीला आखाडे यांनी ही बाब दुर्लक्षित केली, मात्र ४ सप्टेंबर रोजी पुन्हा धुमाळने फोन करून खंडणीची मागणी केली. त्यानंतर तो आपल्या साथीदारांसह शास्त्रीनगर (कोथरूड) येथे पोहोचला आणि दहशत निर्माण करून निघून गेला.

Ajit Pawar:पिंपरी-चिंचवडनंतर पुण्याच्या विकासाची जबाबदारी द्या — अजित पवार

धुमाळ हा एकेकाळी निलेश घायवळच्या टोळीत सक्रिय होता. ( Santhosh Dhumal) मात्र काही वर्षांपूर्वी मतभेद निर्माण झाल्याने त्याने गँग सोडली. त्यानंतर दोन्ही टोळ्यांमध्ये जमिनीच्या वादातून संघर्ष सुरू झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, घायवळ गँगने धुमाळचा “काटा काढण्याचा” प्लॅन आखला होता. १७ सप्टेंबर रोजी घायवळ टोळीतील पाच जणांनी धुमाळवर हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र, नशेत असताना त्यांनी चुकीच्या व्यक्तीवर गोळीबार केला आणि प्रकाश धुमाळ नावाचा व्यक्ती जखमी झाला. खरा टार्गेट असलेला संतोष धुमाळ यावेळी वाचला.

संतोष धुमाळवर आतापर्यंत तब्बल १६ गुन्हे दाखल आहेत. खंडणी, मारहाण, खूनाचा प्रयत्न आणि दहशत निर्माण करणे अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याची पोलिसांची माहिती आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी मोक्का अंतर्गत धुमाळ आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस उपायुक्त (झोन ३) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू ( Santhosh Dhumal) आहे.

Follow Us On