Team My Pune City –राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी (Ajit Pawar) केलेल्या वक्तव्याची सध्या सर्वत्र चांगलीच चर्चा रंगली आहे. दिवाळीच्या तोंडावर संग्राम जगताप यांनी हिंदू आक्रोश मोर्चामध्ये केलेल्या एका वक्तव्यामुळे वाद पेटला आहे. हिंदू आक्रोश मोर्चात बोलताना जगताप म्हणाले की, यंदाच्या दिवाळीत खेरेदी करताना फक्त हिंदूंकडूनच करा. त्यांच्या या विधानावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार आज माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, संग्राम जगतापांचे हे वक्तव्य मला मान्य नाही. “त्यांनी अतिशय चुकीचे विधान केले आहे. आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहोत. एकदा पक्षाची ध्येय-धोरणे ठरल्यानंतर पक्षाच्या विचारधारेपासून कुठलाही खासदार-आमदार किंवा संबंधित जबाबदार व्यक्ती अशा प्रकारची वक्तव्य करत असतील, तर ती वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य नाहीत”
खरंतर अरुणकाका जगताप जोपर्यंत हयात होते, तोपर्यंत तिथं सग रळीत होतं. पण आता काही लोकांनी, आपल्यावर जबाबदारी वाढलेली आहे. आपल्या वडिलाच छत्र आपल्यावर राहिलं नाहीये, त्यामुळे आपण जबाबदारीने वागलं पाहिजे, बोललं पौहिजे. हा शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र सर्वांना पुढे घेऊन जाणारा आहे,” असेही अजित पवार म्हणाले.
Prashant Bhagwat: प्रशांत दादा भागवत युवा मंचच्या वतीने जांभूळ येथे महिलांसाठी खास पर्व – “मनोरंजन संध्या २०२५” उत्साहात !
Pune : राजगडावर मधमाश्यांचा हल्ला; घाबरलेली तरुणी दरीत कोसळली
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, “मी एका कार्यक्रमाला गेलो होतो, तेव्हाही जगताप सांगितलं होतं. ते म्हणाले होते की मी यामध्ये सुधारणा करेन, पण सुधारणा करताना दिसत नाही. त्यामुळे त्यांची जी भूमिका आणि विचार आहेत ते पक्षाला मान्य नाहीत”.आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहोत.”
हिंदू आक्रोश मोर्चात संग्राम जगताप यांचं वक्तव्य
सोलापूरात हिंदू आक्रोश मोर्चावेळी बोलताना जगताप म्हणाले होते की, “मी दिवाळीच्या निमित्ताने सर्वांना विनंती करेन, जे जे दिपावलीच्या निमित्ताने काही खरेदी करतील , ती खेरेदी करताना आपला पैसा आणि नफा फक्त आणि फक्त हिंदू माणसालाच झाला पाहिजे, अशा प्रकारची दिपावली आपण साजरी करावी”, असे संग्राम जगताप म्हणाले होते.