Team My Pune City – पुण्यातील ( Manache Shlok Movie) कोथरुड येथे ‘मनाचे श्लोक’ या चित्रपटाचा शो हिंदुत्ववादी संघटनांनी काल ( दि.१० ) बंद पाडला. सिटी प्राईड चित्रपटगृहात कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत चालू शो थांबवला. दिवसभरात शहरातील आठ शो बंद पाडल्याची माहिती संघटनांनी दिली.
संघटनांचा आरोप आहे की, लिव्ह-इन रिलेशनशिपवर आधारित या चित्रपटाला ‘मनाचे श्लोक’ हे नाव देऊन समर्थ रामदास स्वामींचा अपमान करण्यात आला आहे. त्यामुळे चित्रपटाचे नाव बदलण्याची मागणी करण्यात आली. आंदोलनकर्त्या उज्वला गौड यांनी, “रामदास स्वामींचा अवमान झाल्यामुळे आम्ही हा सिनेमा बंद केला,” असे( Manache Shlok Movie) सांगितले.
PMC : महापालिकेचा मोठा निर्णय: जुन्या भुयारी मार्गाचे रुंदीकरण, वाहतुकीला नवा श्वास
या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच हिंदू जनजागृती समितीने नावावर आक्षेप घेतला होता. धार्मिक ग्रंथाचे नाव व्यावसायिक फायद्यासाठी वापरणे हे श्रद्धेचा अपमान असल्याचे समितीने म्हटले होते. त्यांनी शो बंद करण्याची धमकी दिली होती. याच पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती; मात्र न्यायालयाने ती फेटाळल्याने चित्रपट नियोजित वेळेनुसार( Manache Shlok Movie) प्रदर्शित झाला.
Teacher App : शिक्षकांच्या अध्ययनासाठी डिजिटल सक्षमीकरण ॲप
निर्मात्यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करताना स्पष्ट केले की, चित्रपटात रामदास स्वामी किंवा त्यांच्या श्लोकांचा कोणताही उल्लेख नाही. ‘मनाचे श्लोक’ हे शीर्षक चित्रपटातील नायक मनवा आणि श्लोक यांच्या प्रवासाशी संबंधित आहे. “आम्ही रामदास स्वामींच्या रचनांचा सन्मान करतो, त्यांचा अवमान करण्याचा हेतू नाही,” असे टीमने ( Manache Shlok Movie) सांगितले.
चित्रपटाच्या टीमने हेही नमूद केले की, प्रदर्शनाच्या काही दिवस आधीपासून सोशल मीडियावर विरोधाचे संदेश फिरू लागले होते. त्यामुळे संपूर्ण टीमला मानसिक त्रास सहन करावा लागला. घटनांचा क्रम पाहता हा विरोध पूर्वनियोजित असल्याची शंका त्यांनी व्यक्त ( Manache Shlok Movie) केली.