Team My Pune City- पुणे महापालिकेच्या ( PMC Elections) आगामी निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ रोजी अंतिम केलेली मतदारयादीच वापरण्याचे आदेश दिले आहेत. या यादीत सुमारे ३५ लाख मतदारांचा समावेश असून, त्यानंतर नावनोंदणी केलेल्या मतदारांना मतदानाचा अधिकार मिळणार नाही.
यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मतदारांची यादी घेऊन प्रभागनिहाय विभागणी केली जात होती. मात्र, या वेळी आयोगाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की स्थानिक पातळीवरून यादी घेऊ नये आणि केवळ आयोगाकडून मिळालेली यादीच ग्राह्य धरावी. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून यादी घेण्याची पद्धत रद्द करण्यात आली ( PMC Elections) आहे.
Rashi Bhavishya 11 Oct 2025 – कसा जाईल आपला आजचा दिवस?
महापालिकेला आयोगाकडून मतदारयादी प्राप्त झाली असून, लवकरच तिची प्रभागनिहाय विभागणी सुरू होणार आहे. याबाबत पुणे महापालिकेचे निवडणूक अधिकारी प्रसाद काटकर यांनी माहिती दिली.
Teacher App : शिक्षकांच्या अध्ययनासाठी डिजिटल सक्षमीकरण ॲप
दरम्यान, महापालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम प्रभागरचनेला मान्यता मिळाली आहे. पुढील काही दिवसांत प्रभागनिहाय आरक्षण जाहीर होणार असून, त्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणुकीसाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या निवडणुकीत २०११ च्या लोकसंख्येनुसार मतदान होणार आहे. २०१७ च्या निवडणुकीप्रमाणेच यावेळीही ४९ प्रभागांतून १६५ नगरसेवक निवडले ( PMC Elections) जातील. यापैकी ४० प्रभाग चार सदस्यांचे असतील, तर एक प्रभाग पाच सदस्यांचा असेल.
प्रभाग क्रमांक ३८ (बालाजीनगर–कात्रज–आंबेगाव) हा सर्वांत मोठा प्रभाग असून, त्याची लोकसंख्या सुमारे १ लाख २३ हजार इतकी आहे. त्यामुळे या प्रभागातून पाच नगरसेवक ( PMC Elections)निवडले जाणार आहेत.
अशा प्रकारे, पुणे महापालिकेच्या निवडणुकीत केवळ १ जुलै २०२५ रोजी अंतिम झालेली मतदारयादीच वैध ठरणार आहे. त्यामुळे मतदारांनी आपले नाव या यादीत ( PMC Elections) आहे का, हे तपासणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.