Team My Pune City – ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर लिखित ‘सुरक्षित स्मार्टफोन मार्गदर्शक’ या ६४व्या (Deepak Shikarpur)पुस्तकाचे प्रकाशन दि. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रम सकाळी ११ वाजता १ ए, मल्टीव्हर्सिटी, आय-स्पेस, सर्वे क्रमांक ५१, बावधन खुर्द, पुणे-मुंबई बायपास रोडजवळ येथे आयोजित करण्यात आला आहे.
Pune Rural Police : पुणे ग्रामीण पोलीस दलात 14 अधिकाऱ्यांच्या बदल्या, वडगाव मावळ व कामशेतचे नवीन पीआय नियुक्त
कॉँप्यूटर, इंटरनेट, त्यानंतर आलेला स्मार्टफोन व यांचे जमलेले त्रिकूट यासारख्या घटकांमुळे – महानगरांपासून खेड्यांपर्यंत – सर्वांच्याच जीवनात फरक पडला. इलेक्ट्रॉनिक युगाच्या सुरूवातीपासून (सुमारे १९७०) गेल्या ५५ वर्षांत सर्वाधिक वेगाने प्रसार झालेले उपकरण म्हणजे स्मार्टफोन होय. काही वर्षांपूर्वी दिसायला लहान मोबाईल फोन यायचे. पण, सध्या आधुनिक आणि आकारातही मोठ्या स्मार्टफोन्सचे युग आहे. तंत्रज्ञान जसजसे प्रगती करत आहे तसतसे स्मार्टफोन अधिकाधिक स्मार्ट (अधिक वैशिष्ट्यपूर्ण) बनत आहेत. हे उपकरण कार्य पूर्ण करण्यास जरूर वापरा पण अति वापर टाळा, त्याच्या आधीन होऊ नका व त्याचा सकारात्मक माफक वापर करा. अनेक सायबर गुन्हेगार मोबाईल वापरून अनेक प्रकारचे गुन्हे पण करतात. असे गुन्हेगार अनेक प्रकारे भोळ्याभाबड्या नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढतात. त्यामुळे सावधगिरी बाळगा. हे पुस्तक सर्व वयातल्या मोबाईल वापरकर्त्यांना मार्गदर्शन करेल, असे आहे.