Team My Pune City – शहरातील वाढत्या विनापरवाना फलकबाजीवर ( Pune Illegal Hoardings Action )आळा घालण्यासाठी पुणे महापालिकेने कठोर पावले उचलली आहेत. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिलेल्या आदेशानुसार, परवानगीशिवाय लावलेल्या प्रत्येक फलकासाठी संबंधित व्यक्तीवर हजार रुपयांचा दंड आकारला जाणार असून, फलक काढण्यासाठी होणारा खर्चदेखील त्यांच्याकडून वसूल केला जाणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात फलकबाजी सुरू झाली असून, परवानगी न घेता लावलेल्या अशा फलकांवर कारवाई अधिक कडक करण्यात येणार आहे.
Talegaon School Attack : शाळकरी मुलांच्या भांडणात धारदार शस्त्राने वार
महापालिकेची परवानगी न घेता फलक तयार करणाऱ्या छपाई व्यावसायिकांनाही कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यांनी मशिन परवाना, साठा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्या घेऊनच व्यवसाय सुरू ठेवावा, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. शहरातील कोणत्याही भागात बेकायदा फलक लागणार नाहीत, याची जबाबदारी संबंधित क्षेत्रीय कार्यालयांवर सोपवण्यात आली असून, सहायक आयुक्तांच्या हद्दीत असे फलक आढळल्यास त्यांनाच जबाबदार धरले ( Pune Illegal Hoardings Action )जाणार आहे.
याशिवाय, बेकायदा फलक लावणाऱ्यांविरुद्ध ‘महाराष्ट्र मालमत्तेचे विद्रुपीकरण प्रतिबंध अधिनियम, १९९५’ अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत. महापालिकेची निवडणूक जवळ आल्याने इच्छुक उमेदवारांकडून शहरात मोठ्या प्रमाणात फलक लावले जात आहेत. अशा प्रकरणांमध्ये दंड आकारला गेला असल्यास, उमेदवाराला निवडणुकीसाठी आवश्यक असलेले ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देताना थकबाकी व दंडाची वसुली केली जाणार ( Pune Illegal Hoardings Action ) आहे.