situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune: दिवाळी निमित्त एसटी च्या पुण्यातून ५८९ जादा बस सोडणार – १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान विशेष सेवा

Published On:

Team My Pune City – दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (Pune)(एसटी) पुणे विभागाकडून यंदा तब्बल ५८९ जादा बसची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या बस १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत विविध भागांत धावणार असून, त्यामुळे दिवाळीच्या काळात प्रवाशांना गावी जाण्यासाठी अतिरिक्त सुविधा उपलब्ध होणार आहे.

राज्यातील विविध भागांतून शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायासाठी पुण्यात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हे नागरिक दिवाळी साजरी करण्यासाठी गावी जाणार आहेत. रेल्वेच्या तिकिटांचे बुकिंग पूर्ण भरल्याने नागरिकांना एसटी बसचाच मुख्य पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या गर्दीचा ताण कमी करण्यासाठी अतिरिक्त बससेवा सुरू केली जाणार आहे.

ऑनलाइन बुकिंग सुरू

या जादा बससेवेचे ऑनलाइन बुकिंग सुरू झाले असून, प्रवासी एसटी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.msrtc.maharashtra.gov.in) किंवा मोबाईल अॅपच्या माध्यमातून तिकिट आरक्षित करू शकतात. तसेच, एसटीच्या अधिकृत तिकीट बुकिंग केंद्रांवरही आरक्षणाची सोय करण्यात आली आहे.

खडकीऐवजी पिंपरी-चिंचवड आगारातून बस सुटणार

मागील काही वर्षांपासून दिवाळीच्या काळात खडकी कॅन्टोन्मेंट येथून मराठवाडा व विदर्भासाठी जादा बस सुटत होत्या. मात्र, यंदा खडकी परिसरातील जागा अपुरी आणि अयोग्य असल्याने एसटीकडून पर्यायी जागेचा शोध सुरू होता. वाकडेवाडी बसस्थानकासमोरची आरेची जागा वापरण्याची मागणी एसटीने केली होती; परंतु ही जागा पीएमआरडीएच्या ताब्यात असल्याने त्यांनी परवानगी नाकारली. परिणामी, यंदा सर्व जादा बस पिंपरी-चिंचवड आगारातून सुटण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बसस्थानकानुसार जादा बसची संख्या खालीलप्रमाणे आहे:

शिवाजीनगर बसस्थानक – ८० बस

स्वारगेट बसस्थानक – ११३ बस

पिंपरी-चिंचवड आगार – ३९६ बस

एकूण – ५८९ विशेष बस

Krishnarao Bhegde Pharmacy : कृष्णराव भेगडे फार्मसीला शैक्षणिक कामगिरीसाठी उत्कृष्ट दर्जा

Pimpri Chinchwad: प्रियकराच्या मारहाणीला कंटाळून प्रियसीने भावाच्या मदतीने केला प्रियकराचा खून, 48 तासात आरोपी गजाआड

पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भासाठी विशेष सोय

स्वारगेट बसस्थानकातून पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि रत्नागिरी भागात जाणाऱ्या प्रवाशांसाठी ११३ बस चालवण्यात येतील. तर, शिवाजीनगर येथून नाशिक, नगर, धुळे, जळगाव, औरंगाबाद या भागासाठी बससेवा उपलब्ध असेल.

महामंडळाने गर्दी नियंत्रणासाठी सर्व स्थानकांवर अतिरिक्त कर्मचारी नियुक्त केले असून, प्रवाशांना तिकिट आरक्षण व प्रवास सुलभ होण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.

– एसटीच्या ५८९ विशेष बसमुळे दिवाळीच्या प्रवासाचा ताण कमी होणार, गावी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Follow Us On