कलासक्त कल्चरल फाउंडेशनतर्फे रविवारी आयोजन
Team My Pune City –आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगुळकर आणि प्रसिद्ध संगीतकार सुधीर फडके (Pune)यांनी अजरामर केलेल्या गीत रामायणातील मूळ सांगीतिक रचनांवर आधारित भरतनाट्यम् नृत्यशैलीत नृत्यनाट्याचा आविष्कार रसिकांना अुभवता येणार आहे.
कलासक्त कल्चरल फाउंडेशनतर्फे ‘गीत रामायण : भरतनाट्यम् एक नृत्यानुभव’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन रविवार, दि. 12 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता मयूर कॉलनीती बालशिक्षण मंदिर सभागृहात करण्यात आले आहे, अशी माहिती कलासक्त कल्चरल फाउंडेशनचे संस्थापक श्रीरंग कुलकर्णी यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
PCCOE: पीसीसीओईची टेबल टेनिस स्पर्धेमध्ये विजयाची ‘हॅटट्रिक’
प्रभू रामचंद्र यांच्या जन्मापासून ते राज्यभिषेकापर्यंतचा जीवन प्रवास भरतनाट्यम् नृत्यशैलीत सादर होणार आहे. सौदामिनी राव यांची संकल्पना असून अमिता गोडबोले व कल्पना बालाजी यांनी कार्यक्रमाची गुंफण केली आहे.