Team My Pune City – ज्येष्ठ शिवसैनिक आणि पक्षाचे ( Sanjay Lonkar) संपर्क प्रमुख संजय निवृत्ती लोणकर (वय ६४) यांचे रविवारी (दि.५) पहाटे निधन झाले. धनकवडी स्मशानभूमी येथे काल सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, दोन विवाहित बहिणी, दोन मुले आणि नात असा परिवार आहे.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक अशी ओळख ( Sanjay Lonkar) असणारे संजय लोणकर हे तत्कालीन अहमदनगर, म्हणजेच सध्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसेनेचे पहिले संपर्क प्रमुख होते.
संजय लोणकर यांनी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातही सक्रिय भूमिका बजावली ( Sanjay Lonkar) होती. श्रीरामपूर जिल्हा व्हावा या मागणीसाठी स्थापन झालेल्या श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. राहुरीतील पहिला मोर्चा त्यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता, ज्याला नगर जिल्ह्यातील शिवसेनेच्या इतिहासातील पहिली खुण मानले जाते. ‘युक्रांद’चे संस्थापक माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी आणि बबनराव पाचपुते यांच्यासह त्यांनी काही काळ राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम केले. ते ज्येष्ठ पत्रकार अरुण लोणकर आणि शरद लोणकर यांचे थोरले बंधू होते.
त्यांच्या निधनाबद्दल नगर जिल्ह्यातील तसेच पुण्यातील अनेक जुन्या शिवसैनिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. शिवसेनेचे नगर जिल्ह्याचे माजी उपजिल्हाप्रमुख अरुण पाटील, रमेश बोडके, रघुनाथ कुचिक, उमेश वाघ, अभय छाजेड, संदीप खर्डेकर, अप्पा परांडे यांच्यासह अनेकांनी श्रद्धांजली ( Sanjay Lonkar) अर्पण केली.