Team My Pune City – शासकीय कामकाजात पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा ( Anti-Corruption Department) टिकवण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti-Corruption Bureau – ACB) वतीने पुणे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना महत्त्वाचे आवाहन करण्यात आले आहे. कोणताही शासकीय कर्मचारी (लोकसेवक) किंवा त्याच्या वतीने कोणताही खाजगी इसम शासकीय काम करताना लाच मागत असल्यास नागरिकांनी न घाबरता तात्काळ विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाने केले आहे.
विभागाने स्पष्ट केले आहे की, अशा प्रकारच्या तक्रारींची दखल अत्यंत गोपनीयतेने घेतली जाईल आणि संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागरिकांच्या सहकार्याने लाचखोरीविरोधी मोहिम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न करत आहे.
Talegaon News : तळेगाव जनआंदोलनाला तातडीचा प्रतिसाद
संपर्कासाठी तपशील पुढीलप्रमाणे : ( Anti-Corruption Department)
कार्यालयाचा पत्ता: लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, “C” बराक, सेंट्रल बिल्डिंग, पुणे.
दूरध्वनी क्रमांक: (020) 26132802
मोबाईल व WhatsApp क्रमांक: 9403781064
ई-मेल: dyspacbpune@gmail.com / dyspacbpune@mahapolice.gov.in
अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक : ( Anti-Corruption Department)
शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, पुणे – 9823167154
अजीत पाटील, अपर पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, पुणे – 9029030530
. दयानंद गावडे, पोलीस उपअधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, पुणे – 9423884745
विभागाने सांगितले की, “लाच मागणाऱ्याला नाही म्हणा, आणि तक्रार करा.” नागरिकांच्या तक्रारीमुळेच समाजातून लाचखोरीचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जबाबदारपणे पुढे येऊन अशा प्रकारच्या घटनांची माहिती तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला देण्याचे आवाहन करण्यात आले ( Anti-Corruption Department) आहे.