situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune Crime News : तुळशीबागेत खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पिशवीतून 90 हजारांचे दागिने लंपास; स्वारगेटमध्ये ज्येष्ठाकडील दोन लाखांची सोनसाखळी चोरी

Published On:
Pune Crime News

Team My Pune City – शहरातील गर्दीच्या ठिकाणी (Pune Crime News) चोरट्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातला असून, तुळशीबाग आणि स्वारगेट येथे दोन वेगवेगळ्या चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. तुळशीबागेत खरेदीसाठी आलेल्या एका महिलेच्या पिशवीतून तब्बल 90 हजार रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले, तर स्वारगेट स्थानकात पीएमपी प्रवासी असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील दोन लाखांची सोनसाखळी लांबविण्यात आली. या दोन्ही प्रकरणांमध्ये अनुक्रमे विश्रामबाग व स्वारगेट पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्ता परिसरातील (Pune Crime News) नहे भागात राहणाऱ्या महिलेने शनिवारी (4 ऑक्टोबर) दुपारी तुळशीबागेत खरेदीसाठी हजेरी लावली होती. हुतात्मा बाबू गेणू चौकातून तुळशीबागेकडे जात असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या पिशवीची चेन उघडून आत ठेवलेले 90 हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. चोरी लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलीस हवालदार सुरवसे तपास करत आहेत.

Talegaon Dabhade News : यशवंतनगर पोस्ट ऑफिसमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर

दरम्यान, शहरातील व्यापारी आणि नागरिकांनी तुळशीबाग (Pune Crime News) परिसरात अशा चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. गेल्या काही महिन्यांपासून गर्दीत महिलांकडील दागिने लांबविण्याच्या पाचहून अधिक घटना घडल्या असून, चोरटे अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नाहीत. व्यापाऱ्यांनी दिवाळीचा सण लक्षात घेऊन या भागात साध्या वेशातील पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी केली आहे.

Eknath Shinde : समाजस्नेह पुरस्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर

दुसऱ्या घटनेत, आंबेगाव परिसरात राहणाऱ्या 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शनिवारी रात्री नऊच्या सुमारास ते स्वारगेट स्थानकातून आंबेगावकडे पीएमपी बसने प्रवास करण्यासाठी गेले होते. बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या गळ्यातील तब्बल एक लाख 95 हजार रुपये किमतीची सोनसाखळी (Pune Crime News) लांबविली. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कोतकर तपास करत आहेत.

पोलिसांनी सांगितले की, पीएमपी स्थानकांवर गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी प्रवाशांकडील दागिने, मोबाइल संच आणि रोकड चोरण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. जवळपास दिवसाआड एक ते दोन घटना नोंदविल्या जात असून, या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार करण्याची गरज निर्माण झाली (Pune Crime News) आहे.

Follow Us On