situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

 SSC Exam: दहावीच्या फेब्रुवारी-मार्च 2026 बोर्ड परीक्षेसाठी अर्ज भरण्याच्या तारखांना मुदतवाढ

Published On:

Team My Pune City – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी (माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र) फेब्रु-मार्च 2026 या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन आवेदनपत्र सादरीकरणाच्या तारखांना मंडळाने मुदतवाढ दिली आहे. या निर्णयामुळे नियमित, पुनर्परीक्षार्थी तसेच खाजगी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे.

नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे त्यांच्या माध्यमिक शाळांमार्फत(SSC Exam) UDISE मधील PEN-ID वरून ऑनलाईन पद्धतीने भरावयाची आहेत. तर पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) मिळालेले खाजगी विद्यार्थी (Private Candidate), श्रेणीसुधार योजना, तुरळक विषय तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून (ITI) Transfer of Credit घेणारे विद्यार्थी यांची आवेदनपत्रे मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mahahsscboard.in या ठिकाणी(SSC Exam) भरता येतील.

यासाठी अर्ज दाखल करण्याची मुदतवाढीची कालमर्यादा मंगळवार 7 ऑक्टोबर 2025 पासून सोमवार 27 ऑक्टोबर 2025 पर्यंत निश्चित करण्यात आली आहे. या कालावधीत विद्यार्थी नियमित शुल्क भरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. यापूर्वी 15 सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून आता शाळांना व विद्यार्थ्यांना अधिक वेळ उपलब्ध होणार आहे.

शाळांनी अर्ज भरल्यानंतर परीक्षा शुल्क RTGS/NEFT द्वारे भरणे आवश्यक आहे. शुल्क भरल्यानंतर अर्जांच्या Application Status मध्ये ‘Draft’ चा ‘Send to Board’ असा व Payment Status मध्ये ‘Not Paid’ चा ‘Paid’ असा बदल झाला आहे का याची खात्री शाळांनी करावी, असे मंडळाने स्पष्ट केले आहे. तसेच शुल्काची पावती, विद्यार्थ्यांची यादी आणि प्रिलिस्ट जमा करण्याची तारीख पुढे कळविण्यात येईल.

मंडळाने स्पष्ट केले आहे की, सर्व शाळांनी अर्ज भरण्यापूर्वी School Profile अद्ययावत करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची प्रिलिस्ट उपलब्ध झाल्यावर तिची छपाई काढून विद्यार्थ्यांकडून जनरल रजिस्टरनुसार पडताळणी करून स्वाक्षऱ्या घेणे अनिवार्य आहे. त्या प्रिलिस्टवर मुख्याध्यापकांची शिक्क्यासह स्वाक्षरी असणेही बंधनकारक आहे.
Talegaon: अमली पदार्थ विक्री प्रकरणी एकास अटक


Pune : पुण्यातील वाहतूक कोंडीवर तोडगा म्हणून शहरातील 70 हजार विजेचे खांब हटवणार

शाळांना सूचित करताना मंडळाने सांगितले की, UDISE मधील अद्ययावत PEN-ID द्वारेच नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारले जातील. मात्र पुनर्परीक्षार्थी, खाजगी उमेदवार, श्रेणीसुधार, तुरळक विषय आणि ITI Transfer of Credit विद्यार्थी यांची माहिती UDISE मध्ये नसल्याने त्यांचे अर्ज स्वतंत्रपणे ऑनलाईन पद्धतीने भरावे लागतील. तसेच ज्या विद्यार्थ्यांचा APPAR-ID उपलब्ध आहे, त्याचा उल्लेख अर्जात करणे आवश्यक आहे.

 त्यामुळे फेब्रु-मार्च 2026 च्या दहावी बोर्ड परीक्षेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी व शाळांनी वरील मुदत लक्षात घेऊन आवश्यक ती प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे.

Follow Us On