Team My Pune City – शहरातील प्रमुख रस्ते (Pune )आणि महत्त्वाच्या चौकांमध्ये होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे महापालिकेने ठोस पावले उचलली आहेत. वाहतुकीला अडथळा ठरणारे तब्बल ७० हजार विजेचे खांब व फिडर-पिलर हटविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी महापालिका आणि महावितरण यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी काही दिवसांपूर्वी पथविभागाची बैठक घेतल्यानंतर दोनशेपेक्षा अधिक कनिष्ठ अभियंते प्रत्यक्ष पाहणीसाठी रस्त्यावर उतरले. या पाहणीत वाहतूक कोंडीसाठी रस्त्यावर व पदपथांवर उभारलेले विजेचे खांब मोठा अडथळा असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर वाहतूक पोलीस, महापालिका अधिकारी व महावितरण अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे म्हणाले, “शहरातील अनेक चौकांत व पदपथांवर विजेचे खांब व फिडर-पिलर वाहतुकीला अडथळा ठरत असल्याचे दिसून आले. या सर्व अडथळ्यांची प्रत्यक्ष पाहणी करून ते स्थलांतरित करण्यासाठी संयुक्त समिती स्थापन केली आहे. समितीचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने कारवाई केली जाईल.”
Gurwar Peth Crime : गुरुवार पेठेतील सराफा पेढी चोरी प्रकरणात एक आरोपी उत्तर प्रदेशातून अटक, 36 किलो चांदी जप्त
Talegaon: अमली पदार्थ विक्री प्रकरणी एकास अटक
महावितरणच्या माहितीनुसार, शहरात विविध भागांमध्ये पदपथांवर उभारलेले तब्बल ७० हजार खांब आहेत. या खांबांचे स्थलांतर करण्यासाठी योग्य जागा शोधण्यासाठी सर्वेक्षण केले जाणार असून, त्या जागांची निश्चिती झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
या उपक्रमामुळे रस्त्यांवरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होण्यास मदत होणार असून, वाहनचालक व पादचारी दोघांनाही सुकर प्रवासाचा लाभ मिळेल, अशी अपेक्षा आहे.