situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Gurwar Peth Crime : गुरुवार पेठेतील सराफा पेढी चोरी प्रकरणात एक आरोपी उत्तर प्रदेशातून अटक, 36 किलो चांदी जप्त

Published On:

Team My Pune City – शहरातील ऐतिहासिक गुरुवार पेठेतील (Gurwar Peth Crime)माणिक ज्वेलर्स या सराफा पेढीवर झालेल्या थरारक चोरी प्रकरणात खडक पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. तब्बल 70 किलो चांदीचे दागिने आणि 5 लाख रुपये रोख असा एकूण 67 लाख 60 हजारांचा ऐवज लंपास झालेल्या या चोरी प्रकरणात पोलिसांनी उत्तर प्रदेशमधून एका आरोपीस बेड्या ठोकल्या आहेत. अटक आरोपीकडून तब्बल 36 किलो 442 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

अटक आरोपीचे नाव राजेश महाराणीदिन सरोज (वय 36, रा. माघी चैनगड, थाना महेशगंज, ता. कुंडाख, जि. प्रतापगड, उत्तर प्रदेश) असे आहे. त्याने चोरी केल्यानंतर चांदीची पोती रेल्वेने उत्तर प्रदेशातील आपल्या घरी नेल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पीडित व्यापारी विनोद देवीचंद परमार (वय 41 , रा. मुकुंदनगर) यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

Kothrud: कोथरूडमध्ये मुलाकडून पित्याचा खून


Vijaya Dashmi : श्रीमंत सरसेनापती दाभाडे राजघराण्याच्या शस्त्रपूजनाचा पारंपरिक सोहळा उत्साहात

14 सप्टेंबरच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी गुरुवार पेठेतील माणिक ज्वेलर्स या दुकानात घुसून सिमेंटच्या पोत्यांच्या आकाराच्या तीन गोण्या भरून तब्बल ७० किलोपेक्षा अधिक चांदीचे दागिने व ५ लाख रोख रक्कम असा ६७ लाख ६० हजारांचा ऐवज चोरून नेला होता. चोरटे दागिन्यांनी भरलेली पोती खांद्यावर वाहून नेतानाचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला होता.

या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी खडक पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन कुदळे, उपनिरीक्षक महेंद्र कांबळे यांच्या दोन विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही तपासताना आरोपी गुन्हा करून कपडे बदलून रेल्वेने उत्तर प्रदेशात पळाल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर पोलिस पथक प्रतापगढ (उत्तर प्रदेश) येथे रवाना झाले. १८ सप्टेंबर रोजी आरोपीचा माग काढत पथकाने राजेश सरोज याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने चोरीतील ३६ किलो ४४२ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने पोलिसांसमोर काढून दिले.

पोलिस तपासात आरोपी हे प्रतापगढ (उत्तर प्रदेश) परिसरातील असून, बहुतांश वेळा ते पुणे व मुंबई येथे मजुरी किंवा हमालीचे काम करताना स्थानिकांशी परिचय करून घेतात आणि नंतर त्याच संधीचा फायदा घेत सराफा दुकाने किंवा मोठी चोरी करतात, असे उघड झाले आहे.

ही कारवाई अपर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे, पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले, एसीपी अनुजा माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण, गुन्हे निरीक्षक मनोजकुमार लोंढे, शर्मिला सुतार, उपनिरीक्षक स्वप्निल बनकर तसेच अंमलदार हर्षल दुडम, किरण ठवरे, अजित फरांदे, नीलेश दिवटे, शुभम केदारी, योगेश चंदेल, मयूर काळे यांच्या पथकाने केली.

खडक पोलिसांकडून या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू असून, उर्वरित चोरी गेलेला ऐवज परत मिळवण्यासाठी तपासाची गती वाढवण्यात आली आहे.

Follow Us On