Team My Pune City – सध्या देशात जातीयवाद पसरवला ( Mohan Joshi) जात असताना महात्मा गांधीजींच्या विचारातूनच सद्भाव निर्माण होईल आणि सलोखा नांदेल, असे प्रतिपादन माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी आज (गुरुवारी) बोलताना केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त प्रदेश काँग्रेसच्यावतीने पुणे रेल्वे स्थानक येथील महात्माजींच्या पुतळ्याला मोहन जोशी यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांच्या समवेत पुष्पहार अर्पण करून अभिवादन ( Mohan Joshi) केले. डॉ.बाबा आढाव यांनी शेतकऱ्यांच्या मांडलेल्या मागण्यांना मोहन जोशी यांनी पाठिंबा दिला.
Ekveera Devi : आई एकवीरा देवीच्या गडावर महानवमी होमाने नवरात्रोत्सवाची सांगता
मतांच्या राजकारणासाठी काही शक्ती जातीयवादाचे वातावरण तयार करीत आहेत. अशावेळी महात्माजींच्या विचारांचे महत्व पटते आणि ते विचार अंगीकारण्याची गरज आहे, असे मोहन जोशी यांनी याप्रसंगी बोलताना ( Mohan Joshi) सांगितले.
याप्रसंगी सुनिल मलके, चेतन आगरवाल, खंडू सतीश लोंढे, शाबीर खान, सुरेश कांबळे, आयुब पठाण, ॲड.निलेश बोराटे, डॉ.सुनील जगताप, ॲड.मोहन वाडेकर,प्रशांत वेलणकर, विकास सुपनार, समिर गांधी, विशाल मलके, महेंन्द्र चव्हाण, अनिल आहेर, कन्नैया मिनेकर, सुरेश राठोड, विनय माळी, सचिन भोसले आदी उपस्थित ( Mohan Joshi) होते.