Team My Pune City –विजयादशमी अर्थात दसऱ्याचे औचित्य साधून (Pune)साईनाथ मंडळ ट्रस्टच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेषभूषेत सहभागी होत पाटीपूजन केले. शनिवार पेठेतील न्या. रानडे बालक मंदिराच्या सभागृहात आज (दि. 1) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
साईनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पियूष शहा यांच्या संकल्पनेतून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दसऱ्याला पाटी-पुस्तकांचे पूजन हे ज्ञान, सरस्वती देवी आणि शिक्षणाची देवता यांचे स्मरण करण्यासाठी केले जाते. कारण हा दिवस शारदीय नवरात्रीचा एक भाग असून महासरस्वतीची उपासना केली जाते. पूजनासाठी आठ फुटी सरस्वती पाटीची रांगोळी रेखाटण्यात आली होती. त्या भोवती बसून विद्यार्थ्यांनी सामूहिक पूजा केली. राष्ट्रीय कला अकॅडमीचे अमर लांडे, रोमा लांडे यांनी रांगोळी रेखाटली होती.
Pune : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकाची ९७ लाख ५० हजारांची फसवणूक
Lonavala: गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी २० हजारांची लाच घेताना पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात
पाटी पूजन अर्थात सरस्वती पूजनाद्वारे आपली संस्कृती, परंपरा जपत उत्तम आचार-विचारांचे सोने विद्यार्थांनी लुटावे, देवी सरस्वतीची कृपा असावी या करिता विद्या आणि कलेची देवता सरस्वती मातेस वंदन करावे या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, असे मंडळाचे अध्यक्ष पियूष शहा यांनी प्रास्ताविकात सांगितले.
गंधाली शाह, वज्रलेपनकार स्वाती ओतारी, अभिषेक मारणे, सतीश नाहर, न्या. रानडे बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका अमिता दाते तसेच शिक्षिका शिल्पा पराडकर, मेघा रोंघे, रूपाली शुक्ल, सायली फाटक, सुवर्णा ढवळे उपस्थित होत्या.