Team My Pune City – यंदाच्या पावसाळ्यात ( Pune Rain Update) (जून ते सप्टेंबर) पुणे शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार शहरात एकूण ८४९.२ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला असून, हा पाऊस शहराच्या सरासरीपेक्षा तब्बल ३३ टक्के जास्त आहे.
दरवर्षीप्रमाणे मोसमी वारे साधारणतः १ जून रोजी केरळमध्ये दाखल होतात. मात्र, यंदा २४ मे रोजीच वारे केरळमध्ये दाखल झाले आणि अवघ्या दोन दिवसांत म्हणजे २६ मे रोजी पुण्यात दाखल झाले. त्यामुळे मेच्या शेवटच्या आठवड्यापासूनच शहरात पावसाळ्याची दमदार सुरुवात ( Pune Rain Update) झाली होती.
Rotary City : समाज परिवर्तनात महिलांचे योगदान महत्वाचे – सारिका शेळके
महिनानिहाय पावसाचा आढावा ( Pune Rain Update)
शहरातील आकडेवारीनुसार जून आणि सप्टेंबर महिन्यांत सर्वाधिक पाऊस पडला.
जूनमध्ये २६७.५ मिलिमीटर पाऊस झाला, जो सरासरीपेक्षा ६१ टक्के अधिक आहे.
जुलैमध्ये फक्त १३०.३ मिलिमीटर पाऊस झाला, जो २८ टक्के कमी आहे.
ऑगस्टमध्ये १३४.७ मिलिमीटर पाऊस झाला, जो ७ टक्के कमी आहे.
सप्टेंबरमध्ये तब्बल ३१६.७ मिलिमीटर पाऊस झाला, जो सरासरीपेक्षा ११६ टक्के ( Pune Rain Update) अधिक आहे.