Team My Pune City – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) जाहीर केले आहे की, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत मंडळामार्फत ( 10th-12th Certificate) आता विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या सेवा ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या सेवांमुळे याविद्यार्थ्यांना, पालकांना तसेच नागरिकांना मंडळाच्या कामकाजासाठी प्रत्यक्ष कार्यालयीन फेऱ्या माराव्या लागणार नाहीत.
मंडळाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या आदेशानुसार, ऑनलाइन उपलब्ध होणाऱ्या सेवांमध्ये पुढील बाबींचा समावेश आहे :
1. प्रमाणपत्र प्रत (डुप्लिकेट) – विद्यार्थ्यांनी हरविलेल्या किंवा नुकसान झालेल्या प्रमाणपत्राची प्रत मिळवण्यासाठी आता ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. निर्धारित कालावधीत प्रत विद्यार्थ्यांना मिळेल.
2. प्रमाणपत्रावरील नाव दुरुस्ती (Provisional प्रमाणपत्र) – प्रमाणपत्रावरील नाव दुरुस्ती, दुरुस्त केलेली प्रत मिळवणे ही प्रक्रिया ऑनलाइन होणार ( 10th-12th Certificate) आहे.
Pune : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकाची ९७ लाख ५० हजारांची फसवणूक
3. गुणपत्रिकेवरील नाव दुरुस्ती – विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत जर नावात चूक झाली असेल तर त्यासाठी अर्ज सादर करता येईल.
4. प्रमाणपत्र/गुणपत्रिकेवरील जन्मतारखेची दुरुस्ती – जन्मतारखेतील चूक सुधारून नवे प्रमाणपत्र मिळवणे ही सेवा उपलब्ध होणार आहे.
5. परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र पडताळणी – नोकरी किंवा शिक्षणासाठी लागणाऱ्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याची सुविधा देखील आता ऑनलाइन उपलब्ध ( 10th-12th Certificate) आहे.
Rotary City : समाज परिवर्तनात महिलांचे योगदान महत्वाचे – सारिका शेळके
या सर्व सेवांसाठी निश्चित शुल्क, जबाबदार अधिकारी व कालमर्यादा निश्चित करण्यात आली असून सर्व माहिती मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mahahsscboard.in उपलब्ध आहे.
मंडळाचे सचिव प्रमोद योक्के यांनी प्रसिद्ध केलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे की, विद्यार्थ्यांना पारदर्शक, वेळेत आणि सुलभ सेवा मिळाव्यात या उद्देशाने लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत हा निर्णय घेण्यात आला ( 10th-12th Certificate) आहे.