Team My Pune City – मुळशी तालुक्यातील भूगाव येथील वैष्णवी शशांक हगवणे ( Vaishnavi Hagawane Case) आत्महत्या प्रकरणात आरोपी सासू, नणंद व पतीच्या मित्राचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. पी. क्षीरसागर यांनी फेटाळून लावला आहे. “हुंडाबळी हा समाजाला लागलेला मोठा कलंक आहे,” असे स्पष्ट निरीक्षण नोंदवून न्यायालयाने आरोपींना जामीन नाकारला.
Metro Cable Theft : मेट्रोची केबल चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या प्रमुखास अटक
१६ मे रोजी २४ वर्षीय वैष्णवी हगवणे हिने सासरी राहत्या घरात ( Vaishnavi Hagawane Case) गळफास घेऊन आत्महत्या केली होती. हुंड्यासाठी सतत होत असलेल्या छळाला कंटाळून तिने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे तपासात स्पष्ट झाले. या प्रकरणी वैष्णवीची सासू लता राजेंद्र हगवणे (५४), नणंद करिश्मा (२१, दोघी रा. भुकूम, मुळशी), पती शशांक (२७), सासरे राजेंद्र, दीर तसेच पतीचा मित्र नीलेश रामचंद्र चव्हाण (३५, रा. कर्वेनगर) यांना पोलिसांनी अटक केली होती.
विशेष म्हणजे, वैष्णवीच्या नऊ महिन्यांच्या बाळाचा बेकायदा ( Vaishnavi Hagawane Case) ताबा नीलेश चव्हाण याने घेतल्याचा गंभीर आरोप आहे. याबाबत वैष्णवीचे काका व नातेवाईक जेव्हा नीलेशच्या घरी गेले, तेव्हा त्याने कुटुंबीयांना पिस्तुलाचा धाक दाखविल्याची धक्कादायक बाब समोर आली.
सासू लता, नणंद करिश्मा व मित्र नीलेश यांनी अॅड. विपुल दुशिंग यांच्या मार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र विशेष सरकारी वकील उज्ज्वला पवार ( Vaishnavi Hagawane Case) व फिर्यादी कुटुंबीयांचे वकील अॅड. शिवम निंबाळकर यांनी जोरदार विरोध दर्शविला. शवविच्छेदन अहवालात वैष्णवीच्या शरीरावर तब्बल ३० जखमा आढळल्या असून, तिच्यावर सातत्याने क्रूर छळ होत असल्याचे स्पष्ट झाले. आरोपी नीलेश चव्हाण हा पती शशांक व नणंद करिश्माच्या संपर्कात असल्याचे मोबाइल व आर्थिक व्यवहारातून उघड झाले.
सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायाधीश क्षीरसागर यांनी “वैष्णवीला नऊ महिन्यांचा मुलगा आहे, कोणतीही आई बाळाशिवाय राहू शकत नाही. तिचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले आहे. आरोपींना जामीन दिल्यास ते पुराव्यात छेडछाड व साक्षीदारांवर दबाव आणू शकतात. समाजहिताचाही विचार होणे आवश्यक आहे,” असे निरीक्षण नोंदवून तिन्ही ( Vaishnavi Hagawane Case) आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला.