Team My Pune City – शहरात घरफोडीच्या घटना वाढलेल्या( Kothrud Crime News) असतानाच कोथरूड परिसरात रविवारी पहाटे धक्कादायक घटना घडली. राहुलनगर सोसायटीत दोन चोरट्यांनी घरफोडीच्या प्रयत्नादरम्यान एका तरुणावर लोखंडी गजाने जीवघेणा हल्ला केला. या घटनेत आदित्य हेमंत ढवळे (वय ४२) गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Maval Vichar Manch : वैचारिक दारिद्रय कधीही दाखवू नये-चंद्रकांत निंबाळकर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूडमधील महर्षी कर्वे पुतळ्यासमोरील ( Kothrud Crime News) राहुलनगर सोसायटीतील पी-१ इमारतीत ढवळे कुटुंब राहते. रविवारी (दि. २८ सप्टेंबर) पहाटे साडेतीनच्या सुमारास दोन चोरटे सोसायटीत शिरले. सदनिकेचा दरवाजा बंद असल्याने घर रिकामे असल्याचा गैरसमज चोरट्यांना झाला. त्यांनी दरवाजा ठोठावला असता ढवळे यांनी तो उघडला. दरवाजा उघडताच चोरटे आत शिरले व त्यांनी ढवळे यांना धमकावले.
ढवळे यांनी धाडसाने चोरट्यांना प्रतिकार केला. मात्र, झटापटीत चोरट्यांनी लोखंडी गजाने त्यांच्या डोक्यावर प्रहार केला. यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर चोरट्यांनी शयनगृहातील कपाट उचकटून अंदाजे ७० हजार रुपयांचे दागिने लंपास ( Kothrud Crime News) केले. आरडाओरडा केल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन ते पसार झाले.
Maval Vichar Manch : वैचारिक दारिद्रय कधीही दाखवू नये-चंद्रकांत निंबाळकर
जखमी अवस्थेत ढवळे यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक गणेश दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली पथक कार्यरत असून गुन्ह्याचा तपास सुरू आहे.
या घटनेमुळे कोथरूड परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले ( Kothrud Crime News) आहे.