situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Ind vs Pak : रोमहर्षक अंतिम सामना; भारताने पाकिस्तानला हरवून नवव्यांदा आशिया कप जिंकला

Published On:

Team My Pune City (विवेक कुलकर्णी) –१७ व्या आशिया कपच्या अंतिम सामन्यात ( Ind Vs Pak) भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवत नवव्यांदा विजेतेपद पटकावले. पाकिस्तानने भारतासमोर केवळ १४७ धावांचे आव्हान ठेवले होते, ज्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने तिलक वर्माच्या अविस्मरणीय खेळीच्या जोरावर १९.४ षटकांत ५ बाद १५० धावा करत ऐतिहासिक विजय मिळवला.


सामन्याचा थरार
( Ind Vs Pak)

आशिया कपच्या ४१ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान अंतिम फेरीत आमनेसामने आले होते. दुबईच्या मैदानावर झालेल्या या सामन्याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले होते.नाणेफेक जिंकून भारताने पाकिस्तानला फलंदाजीसाठी आमंत्रित केले.

Medha Kulkarni : कोथरूडमधील गरबा कार्यक्रमावर खासदार मेधा कुलकर्णींची कारवाई; आवाज मर्यादा ओलांडल्याने कार्यक्रम केला बंद

सुरुवातीला साहिबजादा (५७) आणि फखर जमान (४६) यांनी दमदार सुरुवात दिली. मात्र भारतीय फिरकीपटूंनी सामन्याचे पारडे फिरवले. कुलदीप यादवने ३० धावांत ४ बळी घेत पाकिस्तानचा डाव २० षटके पूर्ण होण्याआधीच १४६ धावांत गारद केला. अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी २ बळी घेत पाकिस्तानच्या फलंदाजांना रोखले.

Maval Vichar Manch : वैचारिक दारिद्रय कधीही दाखवू नये-चंद्रकांत निंबाळकर


भारताचा डाव( Ind Vs Pak)

लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात डळमळीत झाली. अभिषेक शर्मा, शुभमन गिल आणि कर्णधार सूर्यकुमार यादव स्वस्तात बाद झाल्याने भारत २० धावांवर ३ बाद अशा संकटात सापडला. मात्र तिलक वर्मा (नाबाद ६९) याने संजू सॅमसन (२३) आणि शिवम दुबे (३३) यांच्यासोबत महत्वाच्या भागीदाऱ्या रचत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. शेवटच्या षटकात १० धावांची गरज असताना तिलकने एक भव्य षटकार ठोकत सामना भारताच्या बाजूने झुकवला. अखेरीस रिंकू सिंगने चौकार मारत विजयावर शिक्कामोर्तब केले.
गौरव

  • सामनावीर: तिलक वर्मा( Ind Vs Pak)
  • सर्वोत्कृष्ट गोलंदाज: कुलदीप यादव (१७ बळी)
  • मालिकावीर: अभिषेक शर्मा
  • संक्षिप्त धावफलक ( Ind Vs Pak)
    पाकिस्तान – सर्वबाद १४६
    साहिबजादा ५७, जमान ४६, अयुब १६
    कुलदीप ३०/४, अक्षर २६/२, वरुण २५/२, बुमराह २५/२
    भारत – १९.४ षटकांत ५ बाद १५०
    गिल १२, दुबे ३३, संजू २३, वर्मा नाबाद ६९
    आफ्रिदी २०/१, फहीम २९/३

Follow Us On