Team My Pune City – भोर तालुक्यातील शिरगाव हद्दीत, भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात रविवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात (Accident) एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात सकाळी अंदाजे २.३० वाजता झाला. पावसामुळे दृष्यमानता कमी झाल्याने आणि रस्त्यालगत सुरू असलेल्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात कार कोसळल्याने ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील रहिवासी राहुल विश्वास पंसारे (वय ४५) यांचा या अपघातात (Accident)मृत्यू झाला. तर त्यांचा सोबती राहुल देवराम मुतकुळे (वय ३२, रा. मुंबई) गंभीर जखमी असून त्यांना महाड येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोघेही गणपतीपुळे दर्शनासाठी निघाले होते, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
PMPML : येवलेवाडीकरांना दिलासा; पीएमपीएमएल बसमार्ग क्र. 170 चा विस्तार
हा अपघात एम.एच. १२ एच.झेड. ९२९९ या क्रमांकाच्या टोयोटा (Accident) कारचा आहे. भोरहून महाडकडे जात असताना रस्त्यावरील पुलासाठी करण्यात आलेल्या कामाच्या खड्ड्यात कार थेट कोसळली. दाट धुके व सततच्या पावसामुळे गाडीचालकाला खड्डा नजरेस आला नाही, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.
Rashi Bhavishya 29 Sept 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
अपघाताची माहिती मिळताच भोर पोलीस ठाण्याचे (Accident) निरीक्षक अण्णासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गणेश लडकट, सुनील चव्हाण, अजयराज साळुंखे, ज्ञानेश्वर शेडगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिक, पोलीस पाटील शंकर पारथे तसेच वक्रतुंड क्रेन सर्व्हिसच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेहाला भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.
या अपघाताची नोंद भोर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, घाट रस्त्यांवरील मुसळधार पाऊस, धुके आणि सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामामुळे प्रवाशांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले (Accident) आहे.