Team My Pune City – नवरात्रोत्सवाच्या उत्साही वातावरणात ( Pune Crime News) पुण्यातील सुखसागरनगर परिसरात भरदिवसा घडलेल्या चोरीच्या घटनेने खळबळ उडाली आहे. एका बंगल्यात देवीच्या मूर्तीवर परिधान केलेला अंदाजे दहा लाख रुपये किंमतीचा सोन्याचा राणीहार अज्ञात चोरट्यांनी लंपास केला.
Natu Karnadak : भालबा केळकर, राजा नातू करंडक स्पर्धा जानेवारीत
तक्रारदार हे सुखसागरनगरमधील बंगल्यात राहतात. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने घरातील देवीच्या मूर्तीस सोन्याचा राणीहार परिधान करण्यात आला होता. २४ सप्टेंबर रोजी दुपारी, पूजा सुरू असताना चोरटे बंगल्यात शिरले आणि देवघरातील मूर्तीवरील हार चोरीला गेला. पूजा करत असताना हार गायब झाल्याचे लक्षात येताच तक्रारदारांनी तातडीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार ( Pune Crime News) दाखल केली.
Rashi Bhavishya 27 Sept 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत असून, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. चोरट्यांचा माग काढण्यासाठी तांत्रिक विश्लेषण आणि स्थानिक माहितीचा आधार घेतला जात आहे.ही घटना धार्मिक श्रद्धा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर असून, नवरात्रोत्सवाच्या काळात ( Pune Crime News) नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.