मुंबा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात युवकांशी साधला संवाद
Team My Pune City –लघुपट म्हणजे वेगळी धारणा असलेली ( Mumbai International Film Festival) सघन कल्पनांची मांडणी होय. आशयाला धरून कथा, कथन व्यवस्था, कथन सरणी यांची मांडणी होणे लघुपटासाठी अपेक्षित असते. चित्रपट या माध्यमाला गांभीर्याने घेण्याची सवय करणे आवश्यक असून यात शिस्तबद्ध मांडणी, सर्जनशीलता, आशयाचा आकृतीबंध साधला गेला पाहिजे, अशी अपेक्षा चित्रपट अभ्यासक समर नखाते यांनी व्यक्त केली.
Case of Bribery : पुणे जिल्ह्यात लाच प्रकरणी तिन्ही महिला तलाठ्यांविरुद्ध कारवाई
मुंबा फिल्म फाऊंडेशनतर्फे केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसेच ( Mumbai International Film Festival) नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएफडीसी) यांच्या सहकार्याने सहाव्या मुंबा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सावाचे पुण्यात आयोजन करण्यात आले असून आज (दि. 26) राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे चित्रपट कसा पहावा या विषयावर समर नखाते यांचा मास्टर क्लास आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमास युवा वर्गाचा प्रचंड प्रतिसाद लाभला. नखाते यांचे स्वागत मुंबा फिल्म फाऊंडेशनचे सचिव विश्वास शेंबेकर यांनी केले. महोत्सवाचे आयोजक जय भोसले, महोत्सव संयोजक वीरेंद्र चित्राव, संचालक अभिषेक अवचार उपस्थित होते. ‘घड्याळांचा दवाखाना’ हा लघुपट दाखवून समर नखाते यांनी अभ्यासपूर्ण भाष्य केले.
उत्तम कलाकृती कधीही थेट संदेश देत नाही तर ती विचार करायला प्रवृत्त करते, असे सांगून समर नखाते पुढे म्हणाले, चित्रपट बघायचा कसा हे समजून घेणे, त्याचप्रमाणे त्या विषयी अभ्यासपूर्ण नोंदी करणे आवश्यक आहे. पात्रांची मनोवृत्ती, स्वभाववृत्ती, दृश्यात्मकता, सामाजिकता अशा अनेक घटकांवर खोलवर अभ्यास गरजेचे असते. चित्रपटातील लय-ताल पद्धतीदेखील समजून घेतली पाहिजे.( Mumbai International Film Festival) उत्तम कलाकृती कधीही थेट संदेश देत नाही तर ती विचार करायला प्रवृत्त करते, असे सांगून समर नखाते पुढे म्हणाले, चित्रपट बघायचा कसा हे समजून घेणे, त्याचप्रमाणे त्या विषयी अभ्यासपूर्ण नोंदी करणे आवश्यक आहे. पात्रांची मनोवृत्ती, स्वभाववृत्ती, दृश्यात्मकता, सामाजिकता अशा अनेक घटकांवर खोलवर अभ्यास गरजेचे असते. चित्रपटातील लय-ताल पद्धतीदेखील समजून घेतली पाहिजे.
आधुनिक तंत्रज्ञानामागे मन-मेंदूतील सर्जनशीलता..
चित्रपट माध्यमाला वलय आहे; परंतु चित्रपट निर्मिती करताना चलचित्र, दृकश्राव्य माध्यमाकडे पाहण्याचा वैचारिक अभ्यास, मनन-चिंतन होणे आवश्यक आहे. ( Mumbai International Film Festival) हे माध्यम प्रभावशाली, भावनिक असले तरी त्या आधी चित्रपटाच्या भाषेचा अभ्यास, त्याची संरचना, व्यवस्था, व्याकरण याचा गांभीर्याने विचार केला जावा. आधुनिक तंत्रज्ञान वापरून आपल्याला सगळे साधता येते हा समज चुकीचा असून त्याच्या मागे कायम मानवी मन आणि मेंदूतील कलात्मकता, सर्जनशीलता कार्य करीत असते हे विसरून चालणार नाही, असेही नखाते म्हणाले.
कथानकाचे बीजतत्त्व, संरचना यांची मांडणी योग्य पद्धतीने होऊन त्यातून कल्पना, सारांश, कथेची रूपरेषा, कथेवर होणारी प्रक्रिया त्यातून पुढे पटकथेची मांडणी सुरू होते. पटकथेच्या अभ्यासासाठी साहित्य, कला, संस्कृती, मूल्य, कथनपद्धती यांचा ( Mumbai International Film Festival) अभ्यास होणे आवश्यक आहे, हा मुद्दा नखाते यांनी अधोरेखित केला.