Team My Pune City – सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत विविध कारवायांदरम्यान जप्त करण्यात आलेल्या(Pune ) एकूण 16 बिनधनी दुचाकी वाहने सध्या पोलीस ठाण्यात पडून आहेत. संबंधित वाहनांची आर.टी.ओ. नोंदीप्रमाणे शोध घेण्यात आला असून, समजपत्रही पाठविण्यात आले आहे. मात्र अद्यापपर्यंत कोणतेही वाहनमालक पोलीस ठाण्यात संपर्क साधलेला नाही.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर वाहने दीर्घकाळापासून जप्त अवस्थेत असल्यामुळे शासकीय लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याबाबत सहकारनगर पोलीस स्टेशनकडून प्रसिध्दीपत्रक जारी करून संबंधित वाहनमालकांना आवाहन करण्यात आले आहे.
Naigaon Crime News : नायगाव येथे रिक्षाचालकाला मारहाण
Pune : पुणे महानगरपालिकेच्या मलनि:सारण प्रकल्पाला ८४२ कोटींची प्रशासकीय मान्यता, लवकरच कामाला सुरुवात
सात दिवसांच्या आत वाहनमालकांनी सहकारनगर पोलीस स्टेशन येथे प्रत्यक्ष येऊन आपल्या गाडीची आवश्यक कागदपत्रे दाखल करून वाहने ताब्यात घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. निर्धारित मुदतीनंतर जर मालकांनी संपर्क साधला नाही, तर नियमानुसार शासकीय लिलाव प्रक्रियेअंतर्गत ही सर्व 16 वाहने विक्रीस काढण्यात येतील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहकारनगर पोलीस स्टेशन, पुणे यांनी सांगितले की, “जप्त वाहने परत मिळविण्यासाठी मालकांनी विलंब न करता आवश्यक ती कागदपत्रे सादर करून ताबा घ्यावा. अन्यथा लिलाव प्रक्रिया अपरिहार्य होईल.”