३ ऑक्टोबरला पुरस्कार वितरण सोहळा
राजीव बर्वे लिखित ‘मनातील पत्रे’: दिलीपराज प्रकाशनच्या ३०००व्या पुस्तकाचे होणार प्रकाशन
Team My Pune City –पुण्यातील दिलीपराज प्रकाशनच्या ५४व्या वर्धापनदिनानिमित्त (Pune)दिल्या जाणाऱ्या दिलीपराज सुवर्णस्मृती ग्रंथोत्तेजक पुरस्काराने अनिल बुक एजन्सीचे संचालक (नागपूर), ज्येष्ठ ग्रंथ वितरक अनिल टांकसाळे यांचा गौरव केला जाणार आहे.
कार्यक्रम शुक्रवार, दि. ३ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात होणार आहे. ५० वर्षांपेक्षा जास्त काळ ग्रंथसेवा करणाऱ्यांना सुवर्णस्मृती ग्रंथोत्तेजक पुरस्काराने दरवर्षी गौरविण्यात येते. पुरस्काराचे यंदाचे पाचवे वर्ष असून मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि ११ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
Pune : डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशन संचलित स्वरमयी गुरुकुलतर्फे;संगीत आनंदमठ नाटकातील गीतांची रविवारी मैफल
Naigaon Crime News : नायगाव येथे रिक्षाचालकाला मारहाण
या वेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष राजीव बर्वे लिखित ‘मनातील पत्रे’या दिलीपराज प्रकाशनच्या गौरवशाली ३०००व्या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ निरुपणकार उल्हास पवार तसेच प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्रवीण टोकेकर, ज्येष्ठ समीक्षक संजय भास्कर जोशी यांची उपस्थिती असणार आहे, अशी माहिती दिलीपराज प्रकाशनचे संचालक मधुर बर्वे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.