मुंबई येथे पुरस्कार सोहळा ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान..
Team My Pune City –महाराष्ट शासन शिक्षण विभाग पुरस्कृत राज्यस्तरीय (Teacher Merit Award)क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार रायगड जिल्ह्यातील गौळवाडी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय गौळवाडी ( ता. कर्जत,) चे मुख्याध्यापक अनिल अर्जुन गलगले यांनामहाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
नरिमन पॉईंट (मुंबई ) टाटा थिएटर नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस (एन .सी. पी. ए) येथे भव्य सोहळ्यात हा पुरस्कार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, या मान्यवरांच्या हस्ते मुख्याध्यापक अनिल गलगले यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी त्यांच्या पत्नी, मुलगा, तसेच कुटुंबीय उपस्थित होते.
Pune: ग्लोबल एज्युकेशन फेअर २०२५ – २७ सप्टेंबरला; विद्यार्थी व पालकांसाठी मोफत प्रवेश
Talegaon Dabhade: मावळ तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत यंदाही कृष्णराव भेगडे स्कूलच्या मुली अव्वल
जावळी तालुक्यातील रामवाडी, (जिल्हा सातारा) गावाचे अनिल गलगले रहिवाशी आहेत. रामवाडी गावाला शैक्षणिक परंपरा आहे. त्यांचे वडील अर्जुन नाना गलगले प्राथमिक शिक्षक होते. मुख्याध्यापक अनिल गलगले (सर) रायगड जिल्ह्यात कर्जत तालुक्यातील गौळवाडी शाळेवर कार्यरत आहेत. त्यांच्या या पुरस्काराने रामवाडी गावाचे नाव शैक्षणिक क्षेत्रात संपूर्ण महाराष्ट्रात रोशन झाले आहे.

मुख्याध्यापक गलगले यांनी पुरस्कारावर मोहर उठविण्याकरिता शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील निकष पूर्ण केले. यामध्ये पर्यावरण संवर्धन, आधारित हरित सेना अंतर्गत वृक्षारोपण, विविध शैक्षणिक उपक्रम,
दहा लाख रुपयांपेक्षा अधिक निधीच्या माध्यमातून भौतिक सुविधा, लेखन सहभागातून दोन पुस्तके प्रकाशित,
विज्ञान गणित विषयावर शैक्षणिक साहित्य निर्मिती केली.
आनंददायी शनिवार, दप्तर विनाशाळा, योगासने कवायत, आदी उपक्रमात सक्रिय सहभाग, दहावी बारावीमध्ये शंभर टक्के निकाल परंपरा, प्रत्येक वर्षी. तालुका, जिल्हा, विभाग, राज्य, पश्चिम भारत विज्ञान जत्रा स्तर अशा माध्यमातून प्रकल्प राबवले, (NCSC रायगड, राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद रायगड) अंतर्गत राष्ट्रीय लेव्हल पर्यंत विद्यार्थ्यांचे शोध निबंध प्रसिद्ध केले.
अनिल गलगले सरांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल अभिनव संस्था पदाधिकारी, शाळेतील ज्येष्ठ शिक्षक आनंदा जाधव, शिक्षक प्रतिनिधी बहिरू सारुक्ते तसेच शिक्षक, शिक्षकेतर वृंद आणि रामवाडी गावातील सर्व ग्रामस्थ यांनी त्यांच्या पुरस्काराबद्दल त्यांचे अभिनंदन करून कौतुक केले.