Team My Pune City – काल दि.२२ रोजी कोल्हापुरतील करवीर निवासनी श्री अंबाबाई मंदिरात तोफेची सलामी देत शारदीय नवरात्र उत्सवाला ( Shri Ambabai) उत्साहात सुरुवात झाली आहे.राज्यासह देशभरातून लाखो भाविकांची करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीच्या दर्शनासाठी गर्दी होत आहे.
नवरात्र उत्सवानिमित्त मंदिर व मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.तसेच फुलांची सजावट करण्यात आली आहे.काल पहिल्या माळेला आकर्षक असे श्री कमलादेवीचे स्वरूप साकारून अलंकारांने सजवले ( Shri Ambabai) होते.
Rotary Club of Pune : सकारात्मक समाजकार्य उभारण्यासाठी मोठी स्वप्ने पहा – शेखर मेहता
अनेक भाविकांनी त्या स्वरूपातील श्री अंबाबाई चे दर्शन घेतले.कोल्हापुरात नवरात्र उत्सवा निमित्त सार्वजनिक मंडळ यांच्या वतीने देवीची मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.पूर्ण शहरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.मंदिर रांगेतील भाविक अंबाबाईच्या नावाचा जयघोष ( Shri Ambabai) करत होते.
Indore Railway Line : इंदोरीवरून जाणाऱ्या नव्या प्रस्तावित रेल्वेमार्गाला वगळण्याची मागणी
काहींनी लहान मुलींना देवीची वेशभूषा करत अलंकारांने सजवून मंदिरात आणले होते.मंदिर परिसरातील हार,फुले, व प्रसादाच्या दुकानांमध्ये गर्दी होती.मंदिर व मंदिर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला ( Shri Ambabai) होता.