situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune Police : नवरात्रोत्सवात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलिसांकडून परिमंडळ एकमधील 43 सराईत कारागृहात रवाना

Published On:
Pune Police

Team My Pune City  – नवरात्रोत्सवात कायदा आणि सुव्यवस्था ( Pune Police) अबाधित राहावी यासाठी पुणे पोलिसांनी सराइत गुन्हेगारांविरोधात मोठी मोहीम राबवली आहे. परिमंडळ एकमधील एकूण 43 सराइतांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे उत्सव काळात गुंडगिरी, दहशत व कायदा मोडण्याच्या प्रकारांना आळा बसणार असल्याचे सांगितले जात आहे.

परिमंडळ एकमध्ये शिवाजीनगर, खडक, विश्रामबाग, फरासखाना, समर्थ आणि डेक्कन पोलीस( Pune Police) ठाण्यांचा समावेश होतो. या सर्व ठिकाणी पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारवाई करण्यात आलेल्या सराईतांविरुद्ध बेकायदा शस्त्र बाळगणे, दारू विक्री, खुनाचा प्रयत्न, मारहाण यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचे गुन्हे नोंदलेले आहेत. यापैकी काही गुन्हेगार शहरातील विविध गुंड टोळ्यांशी संबंधित असून, नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणारे आहेत.

PMPML : नवरात्रोत्सवात पीएमपीएमएलची विशेष पर्यटन बससेवा, पुणे, पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यातील शक्तीस्थळांचे घडवणार दर्शन 

अलीकडच्या काळात शहरात सराईतांचा वचक वाढल्याची उदाहरणे समोर आली आहेत. नाना पेठ भागातील टोळीयुद्धातून ५ सप्टेंबर रोजी आयुष कोमकर याचा ( Pune Police) खून करण्यात आला होता. त्यानंतर कोथरूड परिसरात नीलेश घायवळ टोळीतील सराइतांनी एका व्यक्तीवर पिस्तुलातून गोळीबार केला होता. तसेच दहशत निर्माण करण्यासाठी दुसऱ्या तरुणावर कोयत्याने वार केले होते. या गंभीर घटनांमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Shrikrishna Panse : जुन्या पिढीतील कवी व भगवद्गीतेचे अभ्यासक श्रीकृष्ण पानसे यांचे निधन

या सर्व पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सवाच्या काळात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सराईतांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. पुणे पोलिसांच्या या ठोस पावलामुळे नागरिकांना दिलासा मिळणार असून, पुढील काळातही अशा गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी स्पष्ट केले ( Pune Police) आहे.

Follow Us On