Team My Pune City -कोथरूड च्या डी पी रस्त्यावर भेलकेवाडी, (Kothrud Navratri Festival)येथे उद्या सकाळी श्री.गणेशकृपा सोसायटी समोर, डि.पी रोड परांजपे शाळेजवळ कोथरूड येथे वाघजाई देवीच्या घटस्थापनेने कोथरूड नवरात्र महोत्सव सुरु होणार आहे . याही वर्षी उत्तमोत्तम कार्यक्रमांच्या सादरीकरणाने या महोत्सवाची रंगत वाढणार असल्याचे नवरात्र उत्सवाचे संयोजक क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान चे अध्यक्ष विशाल भेलके आणि उमेश भेलके यांनी सांगितले.
यावर्षीच्या सांस्कृतिक महोत्सवात यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात शुक्रवार 26 सप्टेंबर रात्रौ 9 वाजता जितेंद्र भुरूक यांचे हिट्स ऑफ आर डी बर्मन हा कार्यक्रम सादर होणार असून शनिवार दि. 27 सप्टेंबर रोजी लोकप्रिय कलावंत प्रशांत दामले यांचे “शिकायलो गेलो एक” हे नाटक सादर होणार आहे. तर रविवारी दुपारी 12 वाजता पूनम कुडाळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे “तुमच्यासाठी काय पण” हा दर्जेदार लावण्यांचा कार्यक्रम सादर होणार असल्याचे सांस्कृतिक महोत्सवाच्या प्रमुख संयोजिका व नगरसेविका मंजुश्री खर्डेकर आणि श्वेताली भेलके यांनी दिली.
तसेच हा उत्सव कोजागिरी पर्यंत साजरा केला जाणार असून यात विविध संस्थांना आवश्यक साहित्याची भेट, रास दांडिया, बाल जत्रा असे विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याचे ही मंजुश्री खर्डेकर व श्वेताली भेलके यांनी सांगितले.
PM Narendra Modi: पंतप्रधान आज पाच वाजता देशवासियांशी संवाद साधणार
Talegaon Dabhade: शिक्षक हे पिढी घडवण्याचे काम करतात-चंद्रकांत शेटे
देवी पुढे ढोल पथकाचे स्थिर वादन होणार असून महिलांची महा आरती वा भोंडला देखील होणार असल्याचे उमेश भेलके व अक्षदा भेलके यांनी सांगितले.
या महोत्सवात सादर होणारे सर्व कार्यक्रम मोफत असून मोफत प्रवेशिकांसाठी संदीप खर्डेकर यांच्याशी 9850999995,विशाल भेलके यांना 9011023023 तर उमेश भेलके यांना 9890154050 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.