मिसेस महाराष्ट्र 6.0 ची विजेती
कॅलिस्टा पिजंट यांचा महिला सन्मान उपक्रम
Team My Pune City -महिलांच्या अंगभूत कलागुणांना प्रोत्साहन देऊन (Nisha Balve)त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील नामांकित कॅलिस्टा पिजंट या संस्थेच्या वतीने “महाराष्ट्राची सौंदर्यवती स्पर्धा २०२५” मेगा शो 6.0 याचे आयोजन करण्यात आले होते. चिंचवड येथे झालेल्या या सौंदर्य स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून २५ गृहिणींसह वैद्यकीय, पोलीस, कला, संगणक शिक्षण, समाजसेवा अशा विविध क्षेत्रातील सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या.
यामध्ये पुण्याच्या सौ निशा बालवे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. प्रथम क्रमांकाचा मुकुट, पंधरा हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र ज्येष्ठ समाजसेविका तृप्ती देसाई आणि हमारा विश्व फाउंडेशनच्या अध्यक्ष अनिता अगरवाल यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
द्वितीय पारितोषिक पुण्याच्या कु.रामेश्वरी सेजल यांना मुकुट, बारा हजार रुपये आणि तृतीय क्रमांक विभागून कू. सानिया खान संभाजीनगर आणि सौ. नलिनी वाघोले यांना मुकुट, दहा हजार, सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. इतर सर्व सहभागी स्पर्धकांना सोन्याची नथ, पैठणी आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
उत्कृष्ट तीन उत्कृष्ट पुरस्कारासाठी नम्रता बागुल, वैष्णवी चाळके आणि सुवर्ण बोधि यांना पाच हजार रुपयांचे पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. तसेच कॅलिस्ट इंडिया या स्पर्धेत प्रथम क्रमांक सुजाता शेलार, शीतल वाघमारे आणि रेखा शाह यांनी पटकावला.लहान गटात लिटिल मिस इंडिया विजेती ठरली दुर्वा तेली .
Sunil Shelke: मावळातील चार ग्रामपंचायतींना नवीन कार्यालयांसाठी ८५ लाखांचा निधी; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश
Power Supply : वाहिन्यांवरील तांत्रिक देखभालीचे कामामुळे आज व उद्या; लोणावळा परिसरात वीजपुरवठा चक्राकार पद्धतीने राहणार बंद
परीक्षक म्हणून दीपाली मुंढ़रे, कुसुम द्विवेदी, डॉ. सीमा इंगळे, सोनाल गावंडे, पूर्वा कडू यांनी काम पाहिले. ग्रूमिंग नरेश फुलेलु आणि दिपाली खम्मर यांनी केले. कार्यक्रमाची आऊटफिट परिधान फॅशन इन्स्टिट्यूट,नारायणी रेंटल ॲण्ड डिझायनर बुटीक च्या सौ. अपूर्वा सूर्यवंशी यांनी केले. वेशभूषा आणि केशरचना स्नेहा राईसोनी आणि टीम यांनी केली. प्रमुख पाहुणे म्हणून भूमाता ब्रिगेड च्या संस्थापक आणि ज्येष्ठ समाजसेविका तृप्ती देसाई , ब्रँड अँबेसिडर अविता पुरी ऋतुजा जगदाळे, कावेरी पचाडे, परि मालवीय ,स्नेहा पोद्दार , ज्योती दाभाडे , काजल वाधवानी, वैष्णवी जयपाल, अश्विनी देवकर सोनाली देशपांडे त्रिशा नितीन जाधव सोनल परब हिरा खान इशिका मेश्राम प्रीती रस्तोगी, जिया विश्वकर्मा उपस्थित होते. स्वागत कलिस्ता पेगेंट्स चे संचालक संजीव जोग, सूत्र संचालन रेडिओ जॉकी आर. जे. बंड्या यांनी केले. नितीन साळुंखे यांनी आभार मानले. सारिका डोलणारे आणि नंदिनी यांनी संयोजनात सहभाग घेतला.