Team My Pune City -भोसरी परिसरातील लांडेवाडी येथे शुक्रवारी (दि 19) रोजी (Bhosari)संध्याकाळी चारच्या सुमारास झालेल्या मारहाणीच्या घटनेत एक तरुण जखमी झाला आहे. याप्रकरणी सात आरोपींविरुद्ध भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दोन आरोपी अटकेत आहेत.
फिर्यादी निखील नामदेव कसबे (वय 25, व्यवसाय-सी.एन.सी. ऑपरेटर, रा. दिघी, पुणे) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते पत्नीसह महा ई-सेवाकेंद्रासमोर, विश्वविलास हॉटेलजवळ आले असता आरोपी निलेश धोत्रे, विकी ऊर्फ मानतू जाधव, सुरज गायकवाड, साहिल ठोके, लक्ष्मण नागोले (सर्व रा. शांतीनगर, भोसरी) व दोन अज्ञात साथीदार यांनी त्यांना घेरले. फिर्यादीच्या भावासोबतच्या जुन्या वादातून तसेच मोबाईलचे उरलेले 1 हजार रुपये न दिल्याच्या कारणावरून सर्व आरोपींनी मिळून लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने मारहाण केली.
Sangvi: सांगवी मध्ये रॉयल एनफिल्डचा अपघात; एकाचा मृत्यू तर एक जण जखमी
Power Supply : वाहिन्यांवरील तांत्रिक देखभालीचे कामामुळे आज व उद्या; लोणावळा परिसरात वीजपुरवठा चक्राकार पद्धतीने राहणार बंद
दरम्यान फिर्यादीची पत्नी प्रीती कसबे यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता तिलाही आरोपींनी अश्लील शिवीगाळ करत “तुला इथेच ठार मारेन” अशी धमकी दिली. या घटनेत फिर्यादीस गंभीर दुखापत झाली असून भोसरी पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींपैकी दोन जणांना अटक केली आहे. इतर आरोपी पळून गेले असून भोसरी पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.